नवी दिल्ली Indian Cricket Team announced South Africa Tour : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत तीन टी-20, तीन एकदिवसीय, दोन कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आधी टी-20 मालिका खेळवली जाईल. यानंतर वनडे, तसंच कसोटी समाने होतील.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा : बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांची निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे, तर केएल राहुल वनडे समान्याचा, रोहित शर्मा कसोटी सामन्यात कर्णधार असेल.
रोहित,विराट फक्त कसोटी मालिकेत खेळणार : रोहित शर्मा, विराट कोहली फक्त कसोटी मालिकेत खेळणार आहेत. हे दोन्ही स्टार फलंदाज वनडे, टी-20 संघात दिसणार नाहीय. तसंच विश्वचषकात कहर करणाऱ्या मोहम्मद शमीची केवळ कसोटी संघात निवड झाली आहे. BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहलीबद्दल अपडेट देताना, सांगण्यात आलं की, "रोहित शर्मा, विराट कोहलीनं BCCIला ODI तसंच T20 समान्यातून विश्रांती घेण्याची विनंती केली आहे."
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) प्रसिद्ध कृष्णा.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
हेही वाचा -