मुंबई: बीसीसीआयची (Board of Control for Cricket in India) टूर एंड फिक्सचर कमेटीने शिफारिश केली आहे की, भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका अहमदाबाद आणि कोलकात्यात खेळली जावी. 6 ते 20 फेब्रुवारी पर्यंत खेळले जाणारे सामने सहा ठिकाणांवर म्हणजे अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम खेळले जाणार होते.
परंतु देशात कोविड-19 प्रकरणात वाढ झाल्याने, बीसीसीआयकडे मालिकेसाठी सामन्यांच्या स्थळांची संख्या (Recommendation to BCCI) कमी करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच एक किंवा दोन स्थळांवर सामने खेळण्याने खेळाडूंना प्रवासातून सूट मिळेल आणि कोविडची प्रकरणे उद्भवण्याचे प्रमाण सुद्धा कमी होईल. समितीकडून अहमदाबाद आणि कोलकात्यात सामने आयोजित करण्याची शिफारिश बुधवारी संध्याकाळी पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. क्रिकबजच्या एका रिपोर्टमध्ये म्हणले गेले आहे की, अध्याप सामन्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
या अगोदर क्रिकेट वेस्टइंडीजने (सीडब्ल्यूआय) सांगितले होते की, त्यांना सामन्यांच्या ठिकाणात बदल केला तरी कोणती समस्या नाही. तसेच ते दोन ठिकाणी मालिका खेळण्यासाठी तयार आहेत. सीडब्ल्यूआयचे प्रमुख रिकी स्केरिट (CWI chief Ricky Skerit)म्हणाले होते, अशा प्रकारच्या बदलांचा प्रस्ताव आतापर्यंत माझ्याकडे आलेला नाही. परंतु आम्ही स्थानिक बोर्डाच्या अशा बदलांचा आम्ही स्वीकार करतो. जे कोरोना प्रतिबंधाचे नियम लागू करण्यासाठी सर्वात चांगले आहेत.
बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार वेस्टइंडीजचा संघ 1 फेब्रुवारीला येणार आहे. त्यानंतर ते 3 फेब्रुवारी पर्यंत क्वारंटाईन मध्ये राहणार आहेत. तसेच टीम 4 आणि 5 फेब्रुवारीला नेटमध्ये सराव करतील आणि 6 फेब्रुवारीला पहिला सामना खेळवला जाईल.