नवी दिल्ली: अष्टपैलू अक्षर पटेलच्या ( All-rounder Axar Patel ) 35 चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 64 धावांच्या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजचा रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन चेंडू आणि दोन गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला वनडे तीन धावांनी जिंकला होता. त्याचबरोबर भारतीय संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
-
Talent wins game but teamwork and intelligence wins championship! 🙌 Kudos to team for the amazing face-off! 😍👏 #IndvsWI pic.twitter.com/jMZOjWiTN6
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Talent wins game but teamwork and intelligence wins championship! 🙌 Kudos to team for the amazing face-off! 😍👏 #IndvsWI pic.twitter.com/jMZOjWiTN6
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 25, 2022Talent wins game but teamwork and intelligence wins championship! 🙌 Kudos to team for the amazing face-off! 😍👏 #IndvsWI pic.twitter.com/jMZOjWiTN6
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 25, 2022
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग 12 वा मालिका विजय ( India 12th consecutive series win ) आहे. यासह टीम इंडियाने सलग सर्वाधिक मालिकेत कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तान संघाने सलग 11 वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा पराभव केला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने 2007 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही.
पाकिस्तानच्या संघाने 1996 ते 2021 पर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध एकूण 11 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने 1999 ते 2022 पर्यंत सलग 10 वनडे मालिकेत कॅरेबियन संघाचा पराभव केला आहे.
एका संघाविरुद्ध सलग एकदिवसीय मालिका जिंकणारे शीर्ष 3 संघ-
- 12 मालिका भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2007-2022)*
- 11 मालिका पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (1996-2021)
- 10 मालिका पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज (1999-2022)
हेही वाचा - Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने पहिल्या वनडेमध्ये डान्स सेलिब्रेशनचे सांगितले कारण