नवी दिल्ली: महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर वेस्ट इंडिजसोबत पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सहा गडी आणि 11 चेंडू राखत विजय संपादन केला. वेस्ट इंडिज संघाने दिलेले 119 धावांचे आव्हान भारतीय संघाने सहज पार पाडले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
स्मृती मंधानाचे संघात पुनरागमन: दुसरीकडे, विशेष बाब म्हणजे स्मृती मंधानाचे वेस्ट इंडिजविरुद्ध संघात पुनरागमन झाले आहे. यासोबतच देविका वैद्य यांना स्थान देण्यात आले आहे. यास्तिका भाटिया आणि हरलीन देओल यांना या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकाने मंधानाच्या प्रकृतीला दुजोरा दिला होता. दुसरीकडे, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टीम इंडिया वेस्ट इंडिजपेक्षा पुढे आहे. भारताने वेस्ट इंडिजसोबत आतापर्यंत 20 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय महिला संघाने 12 सामने जिंकले आहेत तर 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर होत आहे. याशिवाय तुम्ही Disney + Hot Star अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकता.
इंडिया प्लेइंग 11: एस मंधाना, शफाली वर्मा, जी रॉड्रिग्स, एच कौर, आरएम घोष, डीबी शर्मा, पी वस्त्राकर, डीपी वैद्य, आरपी यादव, आरएस गायकवाड, आरएस ठाकूर. वेस्ट इंडिज प्लेइंग 11: एचके मॅथ्यूज, एसआर टेलर, एसए कॅम्पबेल, आरएस विल्यम्स, एस गजनाबी, सीए हेन्री, सीएन नेशन, एएस फ्लेचर, एससी सेलमन, एसएस कोनेल, के रामहारक. भारताचा हा दुसरा सामना असल्याने हा सामना रोमहर्षक होण्याची चिन्हे आहेत.
वेस्ट इंडिजने डाव सावरला: पहिल्या विकेटनंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी त्यांचा डाव सावरला आहे. १२ व्या षटकानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या १ बाद ७४ च्या पुढे गेली आहे. वेस्ट इंडिजच्या महिला फलंदाज स्टॅफनी टेलर आणि शेमेन कॅम्पबेल या दोघी क्रीजवर खेळत आहेत. ही भागीदारी तोडण्यासाठी भारत आतुरतेने विकेट शोधत होता. मॅथ्यूज हिला सहा चेंडूत 2 धावांवर ऋचा घोषने पुजा वस्त्राकरवी झेलबाद केले आहे. त्यानंतर आता तिसरी विकेट पडली असून, कॅम्पबेल 30 (36) दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर मंधानाने झेलबाद केले.