नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. कोहली श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू बनला आहे.
-
📹 Mighty Maximum - a 97m SIX from Virat Kohli 👀👀
— BCCI (@BCCI) January 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/q4nA9Ff9Q2 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/R3CzXTWBT5
">📹 Mighty Maximum - a 97m SIX from Virat Kohli 👀👀
— BCCI (@BCCI) January 15, 2023
Live - https://t.co/q4nA9Ff9Q2 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/R3CzXTWBT5📹 Mighty Maximum - a 97m SIX from Virat Kohli 👀👀
— BCCI (@BCCI) January 15, 2023
Live - https://t.co/q4nA9Ff9Q2 #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/R3CzXTWBT5
महेला जयवर्धनेला मागे टाकले : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने 110 चेंडूत नाबाद 166 धावांची खेळी केली. या सामन्यात 62 धावांचा आकडा गाठताच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत महेला जयवर्धनेला मागे टाकले. कोहलीच्या आता वनडे फॉरमॅटमध्ये 268 सामन्यात 12754 धावा झाल्या आहेत. यादरम्यान त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत.
सचिनचा घरच्या मैदानावरील शतकाचा विक्रम मोडला : या सामन्यात शतकासोबतच विराटने सचिन तेंडुलकरचा भारतीय भूमीवर शतक ठोकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारतीय भूमीवर 20 शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या शतकासह विराट कोहलीच्या नावावर आता भारतात 21 शतके करण्याचा विक्रम झाला आहे. याआधी विराटने श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या वनडेतही शतक झळकावले होते. विराट कोहलीने आतापर्यंत 486 सामन्यांमध्ये 74 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 664 सामन्यांमध्ये 100 शतकांचा विक्रम आहे.
सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. यादरम्यान सचिनने 49 शतके आणि 96 अर्धशतके केली आहेत. श्रीलंकेचा कुमार संगकारा या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 14234 धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. पाँटिंगने 13704 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचाच सनथ जयसूर्या 12430 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
कोहलीचा कसोटी आणि T20 मध्ये देखील उत्कृष्ट रेकॉर्ड : विराट कोहलीचे कसोटी आणि T20 मधील आकडे देखील प्रभावी आहेत. कोहलीने आत्तापर्यंत भारतासाठी 104 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 48.91 च्या सरासरीने 8119 धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटीत 28 अर्धशतके आणि 27 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने 115 टी-20 सामन्यांमध्ये 52.74 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 खेळाडू :
- सचिन तेंडुलकर - 463 सामने, 18426 धावा
- कुमार संगकारा - 404 सामने, 14234 धावा
- रिकी पाँटिंग - 375 सामने, 13704 धावा
- सनथ जयसूर्या - 445 सामने, 13430 धावा
- विराट कोहली - 268 सामने, 12754 धावा
हेही वाचा : ICC Womens Under 19 T20 World Cup : भारताची विजयी सुरुवात, द. आफ्रिकेवर सात गड्यांनी विजय