नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली वर्षातील पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. (hardik pandya captain). दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामने मुंबई, पुणे आणि राजकोट येथे होणार आहेत. (India vs Sri Lanka T20 Series). हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार असेल, तर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत या मालिकेचा भाग नसतील.
हार्दिकला आयपीलमध्ये नेतृत्वाचा अनुभव : हार्दिक पांड्याने आतापर्यंत 5 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत, तर एक सामना गमावला आहे. हार्दिक आयपीएलमध्ये गुजरात संघाचा देखील कर्णधार आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली 2022च्या पहिल्याच मोसमात गुजरात संघाला चॅम्पियन बनवले होते.
भारत-श्रीलंका टी-20 वेळापत्रक : भारत-श्रीलंका टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात तर तिसरा आणि अंतिम सामना 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. तिन्ही सामने सायंकाळी सात वाजता सुरू होतील. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत 26 टी-20 सामने खेळले गेले आहेत. भारताने यापैकी १७ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने आठ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. 2022 मध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. ती भारतीय संघाने 3-0 ने जिंकली होती.
भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, भानुका राजपक्षे, चारिथ अस्लांका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा (विकेटकीपर), अशेन बंदरा, महेश थिक्शाना, चमिका करुणारत्ने, राजुना, राजकुमार, डी. दुनिथ वेलागे, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा आणि नुवान तुषारा.