ETV Bharat / sports

India vs Sri Lanka मालिका सुरु होण्याआधीच 'या' खेळाडूचे निलंबन, सोबत झाला लाखोंचा दंड - India vs Sri Lanka

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डावखुरा फलंदाज भनुका राजपक्षा याचे एका वर्षासाठी निलंबन केले आहे.

India vs Sri Lanka Series : SLC Bans Bhanuka Rajapaksa for One Year, But Includes Him in Training Squad for India Series
India vs Sri Lanka मालिका सुरु होण्याआधीच 'या' खेळाडूचे निलंबन, सोबत झाला लाखोंचा दंड
author img

By

Published : Jul 5, 2021, 7:57 PM IST

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डावखुरा फलंदाज भनुका राजपक्षा याचे एका वर्षासाठी निलंबन केले आहे. तसेच त्याला जवळपास ३.७१ लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. असे असले तरी ही निलंबनाची कारवाई दोन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आली आहे. यामुळे भनुकाचे तात्काळ निलंबन होणार नाही. त्यामुळे तो सध्या सरावादरम्यान संघासोबत आहे. तसेच निर्बंध लागू होण्यास काही वेळ असल्याने भारताविरुद्धच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण -

भनुका राजपक्षावर प्लेयर कॉन्ट्रेक्ट २०१९-२० चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याने मीडियामध्ये श्रीलंका बोर्डाविरोधात प्रश्न उपस्थित केले. श्रीलंकन संघातून काढल्याबद्दल भनुका राजपक्षाने सार्वजनिक रूपात विरोध देखील दर्शविला होता. इंग्लंड दौऱ्यात त्याला संघात स्थान द्यायला हवे होतं, असे भनुकाचे म्हणणे होते.

भनुका राजपक्षा याने आरोप केल्यानंतर श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी, राजपक्षा फलंदाजी चांगली करतो. परंतु त्याचे क्षेत्ररक्षण चांगले नाही. याशिवाय त्याचे फिटनेसही ठिक नाही. यामुळे त्याला खेळताना अडचणी येतात, असे सांगितले होते.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आता भनुका राजपक्षा याच्यावर कॉन्ट्रेक्टचे उल्लंघन केल्याचे सांगत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. यासोबत त्याला आर्थिक दंड देखील ठोठावला. परंतु श्रीलंका बोर्डाने हे निलंबन २ वर्षांनी सस्पेंड केले आहे. यामुळे भनुकाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. एकदिवसीय मालिकेला १३ जुलै पासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - श्रेय्यस अय्यर उर्वरित IPL २०२१ हंगामामध्ये खेळणार, ऋषभ पंतचे कर्णधारपद जाणार?

हेही वाचा - WI W Vs Pak W : स्टॅफनी टेलरने हॅट्ट्रिक घेत रचला इतिहास, फलंदाजीत देखील दिले मोलाचे योगदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.