हैदराबाद : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (India v South Africa ODI series) खेळली जाणार आहे. या मालिकेतीलल पहिला सामना बुधवारी खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय कसोटी मालिकेत झालेला पराभव विसरुन नव्या उमेदीने खेळण्यासाठी मैदानात उतरेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेप्रमाणे वनडे मालिका जिंकण्याचा मनसुबा असणार आहे. भारतीय संघाची धुरा के एल राहुलच्या खांद्यावर असणार (KL Rahul will lead India) आहे.
कारण मागील वर्षी बीसीसीआयने कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले होते. त्यानंतर रोहित शर्माला दौऱ्यावर येण्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत झाली (Rohit Sharma was injured). त्यामुळे भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ राहुलच्या गळ्यात पडली आहे. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली एक खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी या दोन संघाची एकमेकाविरुद्ध कामगिरी कशी राहिला आहे. ते पाहणार आहोत.
आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आतापर्यंत 84 वनडे सामने खेळले (India and South Africa played 84 ODIs) गेले आहेत. यापैकी 45 सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि 35 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर यातील 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. 84 वनडे सामन्यांपैकी 35 सामने दक्षिण आफ्रिकेत खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताला 10 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच 22 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र 2 दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
भारती संघासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मागील दौऱ्यात भारताने मालिकेत विजय प्राप्त केला आहे. 2028 साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. तेव्हा भारताने 6 सामन्यांची मालिका 5-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यावेळी भारतीय संघाची धुरा विराट कोहलीच्या हाती होती. भारतीय 1992-93 नंतर दक्षिण आफ्रिके विरुद्ध दक्षिण आफ्रिके पाच वनडे मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाला फक्त एक मालिका जिंकता आली आहे.
या खेळाडूंमधून अंतिम अकरा खेळाडूंची निवड होणार :
भारत - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका - तेंबा बावुमा (कर्णधार), झुबेर हमझा, जानेमन मलान, ए़डेन मार्करम, डेव्हिड मिलर, रॅसी वॅन डर ड्युसेन, मार्को यान्सेन, वेन पार्नेल, अँडिले फेहलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, क्विंटन डी कॉक, काइल वेरेन, केशव महाराज, सिसांडा मगाला, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तब्राइझ शम्सी.