हैदराबाद: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (India v South Africa ODI series) खेळली जाणार आहे. या मालिकेतीलल पहिला सामना आज खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या धुरा के एल राहुलच्या खांद्यावर असणार (KL Rahul will lead India) आहे. कारण मागील वर्षी विराट कोहलीकडून बीसीसीआयने कर्णधारपद काडून घेतले होते. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधार तर के एल राहुलला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले होते. तसेच या दौऱ्यावर येण्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ राहुलच्या गळ्यात पडली आहे.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 जानवारीला खेळला जाणार (The first match on January 19) आहे. तसेच मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 21 आणि 23 जानेवारीला खेळला जाणार आहेत.
पहिला एकदिवसीय सामना कुठे आणि केव्हा पाहता येणार:
या मालिकेतील पहिला सामना पार्ल येथील ( first match will played at Parle) बोलंड पार्क येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील नाणफेक 1:30 वाजता पार पडेल. या सामन्याचे थेट प्रेक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येणार आहे.
या खेळाडूंमधून अंतिम अकरा खेळाडूंची निवड होणार :
भारत - केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका - तेंबा बावुमा (कर्णधार), झुबेर हमझा, जानेमन मलान, ए़डेन मार्करम, डेव्हिड मिलर, रॅसी वॅन डर ड्युसेन, मार्को यान्सेन, वेन पार्नेल, अँडिले फेहलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, क्विंटन डी कॉक, काइल वेरेन, केशव महाराज, सिसांडा मगाला, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तब्राइझ शम्सी.