ओवल - भारतीय संघाने ओवलमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा 157 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. विशेष म्हणजे भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर होता. परंतु दुसऱ्या डावात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत इंग्लंडला मात दिली. बीसीसीआयने या खास विजयानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
-
DO NOT MISS! 😎 😎
— BCCI (@BCCI) September 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
From the dressing room, we get you unseen visuals & reactions post an epic win from #TeamIndia at The Oval 👍 👍 - by @RajalArora
Watch the full feature 🎥 🔽 #ENGvINDhttps://t.co/BTowg3h10m pic.twitter.com/x5IF83J4a0
">DO NOT MISS! 😎 😎
— BCCI (@BCCI) September 7, 2021
From the dressing room, we get you unseen visuals & reactions post an epic win from #TeamIndia at The Oval 👍 👍 - by @RajalArora
Watch the full feature 🎥 🔽 #ENGvINDhttps://t.co/BTowg3h10m pic.twitter.com/x5IF83J4a0DO NOT MISS! 😎 😎
— BCCI (@BCCI) September 7, 2021
From the dressing room, we get you unseen visuals & reactions post an epic win from #TeamIndia at The Oval 👍 👍 - by @RajalArora
Watch the full feature 🎥 🔽 #ENGvINDhttps://t.co/BTowg3h10m pic.twitter.com/x5IF83J4a0
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य एकमेकांना भेटताना पाहायला मिळत आहेत. त्याच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना उमेश यादव म्हणाला की, आम्हाला माहिती होती की, खेळपट्टी सपाट आहे. यामुळे आम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील, यांचा अंदाज होता. आम्ही चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि धावा कमी देण्याचा प्रयत्न केला. कारण आम्हाला माहित होते की, विकेट मिळतील.
दरम्यान, या सामन्यात उमेश यादवने दोन्ही डावात 3-3 गडी बाद केले. विशेष म्हणजे तो मागील डिसेंबरनंतर प्रथमच आपला कसोटी सामना खेळत होता.
शार्दुल ठाकूर म्हणाला की, खूप चांगलं वाटत आहे. ज्या दिवशी मला कळाले की, मी अंतिम सामन्यात आहे. तेव्हा मी माझे योगदान पूर्णपणे देण्याचा निश्चय केला होता.
भारताने असा जिंकला सामना -
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या मलिकेमधील चौथा सामना केनिंग्टन ओवलच्या मैदानावर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा 157 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.
भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 210 धावांत आटोपला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला. ऐतिहासिक विजयात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
हेही वाचा - India vs England : विराट कोहलीने केलं गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक, म्हणाला...
हेही वाचा - शेफाली वर्माचे टी-20 आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान कायम