Update :
श्रीलंकेची भारतावर मात; मालिकेत साधली बरोबरी
दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने झुंजार खेळ करत भारताला ४ विकेटने मात दिली आहे. या विजयासह यजमान संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. भारताच्या १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. पण धनंजय डि सिल्वाने केलेल्या चिवट खेळीमुळे श्रीलंकेला हा विजय साकारता आला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना सुरू झाला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या डावाला सुरुवात झाली असून ऋतुराज गायकवाड आणि शीखर धवन ओपनर बॅट्समन म्हणून मैदानात उतरले आहेत.
यापूर्वी 25 तारखेला झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
दोन्ही संघातील खेळाडू पुढील प्रमाणे -
भारत: शिखर धवन (कप्तान), ऋतुराज गायकवाड़, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया, वरुण चक्रवर्ती.
श्रीलंका: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), धनंजया डिसिल्वा, सदीरा समरविक्रमा, दसुन शनाका (कप्तान), रमेश मेंडिस, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, इसुरु उडाना, अकीला धनंजय, दुष्मंथा चमीरा.
भारताचे श्रीलंकेसमोर 133 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा केल्या.
शीखर धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या. देवदत्त पडीक्कल याने 29 तर ऋतुराज गायकवाडने 21 धावांची भर घातली.