ETV Bharat / sports

सेहवागचा रवी शास्त्रींवर गंभीर आरोप, म्हणाला... - sehwag on rohit sharma

शास्त्री यांनी गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला सांगितले होते, की ते निवड समितीचा भाग नाहीत, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी रोहितचा भारतीय संघात समावेश करायचा की नाही हा त्यांचा निर्णय नाही.

virendra sehwag made serious allegations against ravi shastri
सेहवागचा रवी शास्त्रींवर गंभीर आरोप, म्हणाला...
author img

By

Published : Nov 4, 2020, 5:07 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ''शास्त्री यांना रोहितच्या दुखापतीविषयी माहित नाही, असे होऊ शकत नाही'', असे सेहवागने म्हटले. दुखापतीच्या कारणास्तव रोहितची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली नाही. मात्र, आयपीएलमध्ये मंगळवारी खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात रोहित कर्णधार म्हणून मैदानावर उतरला. या सामन्यामुळे त्याच्या दुखापतीविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

virendra sehwag made serious allegations against ravi shastri
रवी शास्त्री

रवी शास्त्रींचे मत -

शास्त्री यांनी गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला सांगितले होते, की ते निवड समितीचा भाग नाहीत, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी रोहितचा भारतीय संघात समावेश करायचा की नाही हा त्यांचा निर्णय नाही. याव्यतिरिक्त रोहितच्या वैद्यकीय अहवालाविषयी मला माहिती आहे. त्याला पुन्हा दुखापत होऊ शकते. त्यामुळे त्याला संघात पुनरागमन न करण्याचा चा परत न जाण्याचा सल्ला देण्यात आला.

सेहवागचा हल्लाबोल -

सेहवाग म्हणाला, ''रोहितची संघात निवड झाली पाहिजे होती आणि जर तो तंदुरुस्त नसेल त्याच्या जागी कोणालाही संघात घेता आले असते. मात्र, जो खेळाडी आपल्या फ्रेंचायझीसाठी खेळू शकतो, त्या खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड झाली नाही. हे बीसीसीआयचे ढिसाळ व्यवस्थापन आहे. त्यांना रोहितची पूर्ण माहिती घ्यायला हवी होती.''

सेहवाग म्हणाला, "जर तो दुखापतग्रस्त झाला असता, तर त्याच्याऐवजी दुसर्‍या कोणाचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. परंतू त्याची भारतीय संघात निवड झाली नाही, हे मला समजले नाही. हे आश्चर्यकारक आहे. त्याने शेवटचा सामना मी हैदराबाद विरुद्ध खेळला आहे. तो प्लेऑफमध्ये खेळेल. तो सांगत आहे, की मी तंदुरुस्त आहे. तुम्ही त्याला का निवड नाही?"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.