अॅडलेड - ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा संघ दुसऱ्या डावात नामुष्कीजनक 36 धावाच करू शकला. भारतीय संघाची कसोटी कारकिर्दीतील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी 1974 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताने फक्त 42 धावा केल्या होत्या, आता हा कमी धावांचा विक्रम मोडला गेला आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शनिवारी भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावात संपुष्टात आणला.
यापूर्वी भारताची सर्वात कमी धावसंख्या 42 धावा अशी होती. इंग्लंडविरुद्ध 1974 मध्ये लॉर्ड्स येथे ही खराब कामगिरी नोंदवली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे, 1955 साली ऑकलंडमध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध 26 धावा केल्या होत्या.
कसोटीमधील सर्वात कमी धावसंख्या -
- 26 - न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, मार्च 1955 (ऑकलंड)
- 30 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी 1896 (पोर्ट एलिझाबेथ)
- 30 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड जून 1924 (बर्मिंगहॅम)
- 35 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, एप्रिल 1899 (केपटाऊन)
- 36 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1932 फेब्रुवारी (मेलबर्न)
- 36 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मे 1902 (बर्मिंगहॅम)
- 36 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डिसेंबर 2020 (अॅडलेड)
- 38 - आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, जुलै 2019 (लॉर्ड्स)
- 42 - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मार्च 1946 (वेलिंग्टन)
- 42 - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, फेब्रुवारी 1888 (सिडनी)