मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोव्स्की मेलबर्न येथे भारताविरुद्ध होणार्या दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. मात्र, त्याचा सहकारी फलंदाज जो बर्न्स या कसोटीत खेळणार आहे. २६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना रंगणार आहे.
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक
एका वृत्तानुसार, पहिल्या सराव सामन्यात पुकोव्स्कीच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळे तो पहिला सामनाही खेळू शकला नाही. त्यामुळे पुकोव्स्कीला आता पदार्पण करण्यास वेळ लागेल. पुकोव्स्कीला आतापर्यंत नऊ वेळा कन्कशनला सामोरे जावे लागले आहे.
दुसरीकडे, सलामीवीर बर्न्सला बॉक्सिंग डे कसोटी खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बर्न्सला जसप्रीत बुमराहच्या वेगवान चेंडूमुळे दुखापत झाली होती. दुखापत होऊनही त्याने नाबाद ५१ धावा केल्या होत्या. धाकड सलामीवीर डेव्हिड वॉर्नरदेखील बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहे. वॉर्नर बर्न्ससह डावाची सुरुवात करू शकतो. वॉर्नर शनिवारी सिडनीहून मेलबर्नलाआला.