सिडनी - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन एबॉट भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले असून त्याच्या जागी अष्टपैलू मोइसेस हेन्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. १७ डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - मोठी बातमी..पहिल्या हिंदकेसरी मल्लाचे निधन
डे-नाईट सराव सामन्यात एबॉटला दुखापत झाली. त्यामुळे तो रिहॅबमध्ये वेळ घालवणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने यासंबंधी ही माहिती दिली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापूर्वी तो संघात सामील होऊ शकतो. हेन्रिक्स दुसर्या सराव सामन्यात खेळणार होता. मात्र, बुधवारी त्याचा अहवाल समोर आला. हेन्रिक्सचे स्नायू ताणले गेले असल्याचे या अहवालात दिसून आले. आज सोमवारी घेण्यात आलेल्या फिटनेस टेस्टमध्ये हेन्रिक्स यशस्वी झाला असून तो संघात सामील होणार आहे.
डेव्हिड वॉर्नरही पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतग्रस्त विल पुकोव्स्कीसुद्धा पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्याऐवजी संघात मार्कस हॅरिसची निवड झाली आहे.