ETV Bharat / sports

'या' कारनाम्यामुळे स्मिथ अश्विनला आयुष्यभर लक्षात ठेवेल!

author img

By

Published : Dec 27, 2020, 7:08 AM IST

Updated : Dec 27, 2020, 7:35 AM IST

सामन्याच्या १५ व्या षटकात स्मिथला रविचंद्रन अश्विनने बाद केले. चेतेश्वर पुजाराने स्मिथचा झेल घेतला. स्टिव्ह स्मिथ पहिल्यांदाच भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. याआधी कधीही तो भारताविरुद्ध शुन्यावर बाद झाला नव्हता.

Australia batsman Steve Smith dismissed for duck against india in international cricket
'या' कारनाम्यामुळे स्मिथ अश्विनला आयुष्यभर लक्षात ठेवेल!

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलिया संघाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९५ धावा करू शकला. या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या स्टीव्ह स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. या भोपळ्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

हेही वाचा - दिल्लीत अवतरले तब्बल ८०० किलोंचे अरुण जेटली!

सामन्याच्या १५ व्या षटकात स्मिथला रविचंद्रन अश्विनने बाद केले. चेतेश्वर पुजाराने स्मिथचा झेल घेतला. स्टिव्ह स्मिथ पहिल्यांदाच भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. याआधी कधीही तो भारताविरुद्ध शुन्यावर बाद झाला नव्हता. त्यामुळे स्मिथला शुन्यावर बाद करणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. कसोटी कारकिर्दीत केवळ पाचव्यांदाच स्मिथ शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे सन २०१६ नंतर पहिल्यांदाच स्मिथ शुन्यावर बाद झाला आहे.

स्मिथ आणि भारत -

स्मिथने भारताविरुद्ध त्याच्या कारकिर्दीत ३९ सामने खेळले आहेत यातील ४७ डावात खेळताना त्याने ६३.३३ च्या सरासरीने २६६० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १२ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

लाबुशेन-हेडमध्ये भागिदारी -

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांमध्ये गुंडाळत आश्वासक सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चौथ्या गड्यासाठी ८६ धावांची भागादीरी केली. जसप्रीत बुमराह ४ आणि रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत मोलाची साथ दिली.

Last Updated : Dec 27, 2020, 7:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.