ETV Bharat / sports

श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ

author img

By

Published : May 11, 2021, 10:41 PM IST

भारताचा दुसरा संघ श्रीलंकाविरोधात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे.

india-team-for-sri-lanka-tour-2021-shikhar-dhawan-prithvi-shaw-suryakumar-yadav-manish-pandey
श्रीलंका दौऱ्यासाठी असा असू शकतो संभाव्य भारतीय संघ

मुंबई - बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी दुसरा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया २ जूनला रवाना होणार आहे. तिथे टीम इंडिया सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या टीमचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. तर या दरम्यान, दुसरा संघ श्रीलंकाविरोधात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळेल. या संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे खेळाडू असू शकतात.

श्रीलंकेमध्ये शिखर धवन आणि पृथ्वी शॉ भारतीय संघाची सलामीची धुरा सांभाळू शकतात. तर सूर्यकुमार यादव, मनीष पांडे हे मधल्या फळीत फलंदाजी करण्यात तरबेज आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीचे डायरेक्टर राहुल द्रविड यांना श्रीलंका दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, भरत अरुण आणि विक्रम राठोड हे इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहेत. जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध ५ सामन्याची कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या प्रशिक्षकांची संघाला साथ असणे आवश्यक आहे. अशात श्रीलंका दौऱ्यासाठी द्रविड यांच्याकडे प्रशिक्षणाची जबाबदारी सोपण्यात येऊ शकते. द्रविड यांच्यासोबत एनसीएचा सहकारी स्टाफ देखील पाठवला जाऊ शकतो.

टी-२० विश्वकरंडक पाहता बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी फक्त स्पेशालिस्ट खेळाडूंनाच पाठवण्याची घोषणा केली आहे. अशात आयपीएलमधील कामगिरी पाहून खेळाडूंची निवड केली जाऊ शकते. यात ६ फलंदाजांचा समावेश संघात केला जाऊ शकतो. यात धवन, शॉ, सूर्यकुमार, मनीष, देवदत्त पडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळू शकते.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती २ यष्टीरक्षकांची निवड करू शकते. यात संजू सॅमसन आणि इशान किशन यांना संधी मिळू शकते. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, हर्षल पटेल आणि राहुल तेवतिया यांची निवड केली जाऊ शकते. याशिवाय शिवम दुबेला देखील संधी मिळू शकते.

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंना संघात स्थान मिळू शकतं. याशिवाय राहुल चहर आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती देखील शर्यतीत आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये चेतन सकारिया, दीपक चहर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांना संधी मिळू शकते. तर भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन हे जर दुखापतीतून सावरले तर त्यांना संघात निश्चित स्थान मिळेल.

हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह सापडलात तर.., BCCIने खेळाडूंसाठीचे नियम केले कडक

हेही वाचा - IPL २०२१ : भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत, मुंबईच्या प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.