साउथम्पटन - भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या ११ शिलेदारांची निवड केली आहे. सामन्याच्या एक दिवस आधीच भारताने आपला अंतिम संघ निवडला आहे. बीसीसीआयने अंतिम संघाची घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली.
-
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) June 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's #TeamIndia's Playing XI for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/DiOBAzf88h
">🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) June 17, 2021
Here's #TeamIndia's Playing XI for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/DiOBAzf88h🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) June 17, 2021
Here's #TeamIndia's Playing XI for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/DiOBAzf88h
भारतीय संघ अंतिम सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघाच्या सलामीची धुरा युवा शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आहे.
रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अष्टपैलू भूमिका निभावतील. याशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घालण्याचा प्रयत्न करतील.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या शुक्रवारपासून अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरूवात होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
भारताचा अंतिम संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
हेही वाचा - WTC Final वर पावसाचं सावट?, जाणून घ्या साउथम्पटनचा हवामान अंदाज
हेही वाचा - कॅमेऱ्याला पाहू की तुला? बुमराहचा खट्याळ प्रश्न; पाहा संजनाने घेतलेली जसप्रीतची मुलाखत