लंदन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओल्ड ट्रॅफोर्ड येथे नियोजित पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली. इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघावर गंभीर आरोप केले. आता या कसोटीविषयी मोठे अपडेट समोर आले आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळू शकतो. उभय संघात ओल्ड ट्रॅफोर्ड येथे हा सामना खेळला जाईल.
इंग्लंड 2022 च्या शेड्यूलमध्ये या सामन्याचा समावेश होऊ शकतो. याविषयीची चर्चा सुरू आहे. या सामन्याने 2021 मधील कसोटी मालिका पूर्ण होईल. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
रिपोर्टनुसार, हा कसोटी सामना किंवा मालिका ऑगस्टमध्ये होईल, याची शक्यता आहे. परंतु याची पृष्टी अद्याप झालेली नाही. पण यातून मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतरची नुकसान भरपाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, या कसोटी सामन्याऐवजी दोन टी-20 सामन्याची मालिका खेळवण्याविषयीची चर्चा सुरू होती. पण आता याला पूर्णविराम मिळाला. भारतीय संघ पुढील वर्षी लिमिटेड षटकाची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.
हेही वाचा - CSK vs KKR : केकेआरचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
हेही वाचा - IPL 2021 : पंजाब किंग्सने केवळ पाच धावांनी केला सनरायझर्स हैदराबादचा पराभव