मुंबई - श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेला १८ जुलैपासून सुरूवात होणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान शिखर धवनकडे सोपण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका जेव्हा आमने-सामने होतील तेव्हा अनेक रेकॉर्डसची नोंद होईल. तसेच काही जुने रेकॉर्ड देखील मोडीत निघतील. दरम्यान, आम्ही तुम्हाला या मालिकेला सुरूवात होण्याआधी भारत-श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त झेल पकडणाऱ्या खेळाडूबद्दल सांगणार आहोत.
झेल पकडण्यात किंग आहे महेला जयवर्धने
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने याने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये १० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. जयवर्धने एक चांगल्या फलंदाजासह उत्कृष्ट झेत्ररक्षक देखील राहिला आहे. त्याने भारत-श्रीलंका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल टिपले आहे. या बाबतीत तो किंग आहे. त्याने ८७ सामन्यात ३८ झेल घेतले आहेत.
सचिन दूर तर विराटच्या नावे किती झेल जाणून घ्या...
महेला जयवर्धने याच्यानंतर या यादीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचे नाव येते. सचिनने ८४ एकदिवसीय सामन्यात ३० झेल घेतले आहे. या यादीत सुरेश रैना तिसऱ्या स्थानी असून त्याने ५५ सामन्यात २२ झेल घेतले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत जयवर्धनेपासून खूप लांब आहे. विराटने ४७ सामन्यात २२ झेल टिपले आहे. कोहली जर श्रीलंका दौऱ्यावर आला असता तर त्याचा रेकॉर्ड आणखी दमदार झाला असता. परंतु तो सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारत-श्रीलंका मालिकेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यात एकदिवसीय मालिकेतील सामने १८, २० आणि २३ जुलै रोजी होणार आहेत. तर टी-२० मालिकेचा पहिला सामना २५ जुलै, दुसरा सामना २७ जुलै आणि तिसरा सामना २९ जुलैला खेळला जाणार आहे.
हेही वाचा - Copa America: अर्जेंटिनाचे सेलिब्रेशन; दुसरीकडे मेस्सीकडून पराभूत नेमारचे सांत्वन, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - पाकिस्तानचा सामना कोणीही पाहू नये, असा प्लॅन पीसीबीने आखलाय; शोएब अख्तरचा गंभीर आरोप