कोलंबो IND vs SL Asia cup : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आज (रविवार, १७ सप्टेंबर) भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान आहे. आजची फायनल मॅच जिंकल्यास भारत विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाचं विजेतेपद पटकावेल. तर श्रीलंकेनही सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारतानं बांग्लादेशविरुद्ध सुपर ४ सामन्यात आपल्या प्लेइंग ११ मध्ये बदल करत बेंच स्ट्रेंथ तपासली होती. मात्र आजच्या सामन्यात टीम इंडिया आपला सर्वोत्तम संघ खेळवणार यात शंका नाही.
खेळपट्टीचा अहवाल : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करेल, कारण आत्तापर्यंत सर्व संघांनी तेच केलंय. प्रेमदासाची ही खेळपट्टी लाईटखाली स्लो होते. शेवटच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या सामन्यात भारतीय संघाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. या खेळपट्टीवर टर्न आणि बाउन्स आहे. तसेच वेगवान आउटफिल्ड आणि छोट्या बाउंड्रीमुळे फलंदाजांना फायदा होऊ शकतो. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या २३३ आहे.
-
Check the Weather Prediction for IND vs SL Asia Cup 2023 Final in Colombo 🌧️⛈️
— SportsTiger (@The_SportsTiger) September 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📷: BCCI/PCB#INDvSL #SLvIND #AsiaCup2023 #AsiaCupFinal #TeamIndia #SriLankaCricket #AsiaCup #Cricket #ODICricket #Colombo #CricketMatch #CricketWorld #cricketupdates #CricketFans pic.twitter.com/izIqvq5iKl
">Check the Weather Prediction for IND vs SL Asia Cup 2023 Final in Colombo 🌧️⛈️
— SportsTiger (@The_SportsTiger) September 16, 2023
📷: BCCI/PCB#INDvSL #SLvIND #AsiaCup2023 #AsiaCupFinal #TeamIndia #SriLankaCricket #AsiaCup #Cricket #ODICricket #Colombo #CricketMatch #CricketWorld #cricketupdates #CricketFans pic.twitter.com/izIqvq5iKlCheck the Weather Prediction for IND vs SL Asia Cup 2023 Final in Colombo 🌧️⛈️
— SportsTiger (@The_SportsTiger) September 16, 2023
📷: BCCI/PCB#INDvSL #SLvIND #AsiaCup2023 #AsiaCupFinal #TeamIndia #SriLankaCricket #AsiaCup #Cricket #ODICricket #Colombo #CricketMatch #CricketWorld #cricketupdates #CricketFans pic.twitter.com/izIqvq5iKl
हवामानाचा अंदाज : आजच्या सामन्यात जर हवामान खराब असेल तर दोन्ही संघांची रणनीती भरकटू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी पावसाची ९० टक्के शक्यता आहे. तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. जसजसा सामना पुढे जाईल, तशीतशी पावसाची शक्यता अधिक आहे.
राखीव दिवस आहे का : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पावसामुळे खेळ झाला नाही तरी चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही. कारण या सामन्यासाठी सोमवारचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र हवामानाच्या अंदाजानुसार, राखीव दिवशीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, त्या दिवशीही सामना न झाल्यास भारत आणि श्रीलंका यांना स्पर्धेचे संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.
भारत आणि श्रीलंकेचा संभाव्य संघ :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन/तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
- श्रीलंका : कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समराविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, दुशन हेमंथा, मथिशा पाथिराना, कसून राजिथा.
हेही वाचा :
- Neeraj Chopra : नीरज चोप्राचं विजेतेपद थोडक्यात हुकलं, डायमंड लीग स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान
- Asia Cup २०२३ : 'आयसीसी फक्त बकवास करते. यामुळे क्रिकेट...', श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा भडकला
- Gambhir on Dhoni : धोनीबाबत गौतम गंभीरचं आणखी एक मोठं वक्तव्य; म्हणाला, 'धोनीमुळे रोहित शर्मा...'