कोलंबो - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. भारताने आजच्या सामन्यातील नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेमध्ये विजयाची हॅट्रीक साधून क्लिन स्वीप करण्याची संधी आज भारताकडे आहे.
भारतीय संघाचे तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये पाच नवे खेळाडू पदार्पण करीत आहेत. नितीश राणा, राहुल चाहर, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम आमि संजू सॅमसन अशी या खेळाडूंची नावे आहेत.
एकाचवेळी पाच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात पदार्पण करण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी 1980 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोदात मेलबर्न मैदानात भारताच्या वतीने दिलीप दोषी, कीर्ति आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटिल आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांनी पदार्पण केले होते. त्यावेळी बारतीय संघाने 66 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
तीन मालिकेच्या या मालिकेमध्ये भारतीय संघाने 2 सामने जिंकले आहेत. पहिला सामना 7 गडी राखून तर तिसऱ्या अटीतटीच्या सामन्यात 3 गडी राखून बारताने विजय संपादन केला होता.
भारत-श्रीलंकाचे आज खेळणारे खेळाडू
भारत - शिखर धवन (कप्तान), पृथ्वी शॉ, संजू सॅमसन (विकेटकीपर), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उप-कप्तान), नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
श्रीलंका - दासुन शनाका (कप्तान), अविष्का फर्नांडो, मिनोड भानुका, भानुका राजपक्षे, धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, दुष्मंथा चमीरा आणि लक्षण संदाकन.
हेही वाचा - Tokyo Olympic : महाराष्ट्राचा प्रविण जाधव 31व्या स्थानावर; अतनूने मिळवले 35वे स्थान