नवी दिल्ली IND VS SA Test Virat Kohli Returns Home : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून 2 क्रिकेट कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. याआधीच भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी एक नाही तर दोन आश्चर्यकारक बातम्या समोर आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतात परतलाय. तीन दिवसांपूर्वीच तो दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी निघाल्याचंही समोर आलंय.
दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतला विराट : विराट कोहलीच्या मायदेशी परतण्यामागं कौटुंबिक कारण असल्याचं बोललं जातंय. मात्र दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यानं संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यातून बाहेर पडण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. बीसीसीआयनं त्याची विनंती मान्य केल्यानं तो भारतात परतला. विराटला अद्याप कसोटी मालिकेतून वगळण्यात आलेलं नाही. तो अजूनही कसोटी संघात कायम आहे. तो सामन्यापूर्वी संघात सामील होऊ शकतो.
-
Star batter Virat Kohli returning to India due to personal reasons ahead of Test series against South Africa
— ANI Digital (@ani_digital) December 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/oJqk9EGhrK#ViratKohli #India #SouthAfrica #BCCI pic.twitter.com/P27iJnvUSp
">Star batter Virat Kohli returning to India due to personal reasons ahead of Test series against South Africa
— ANI Digital (@ani_digital) December 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/oJqk9EGhrK#ViratKohli #India #SouthAfrica #BCCI pic.twitter.com/P27iJnvUSpStar batter Virat Kohli returning to India due to personal reasons ahead of Test series against South Africa
— ANI Digital (@ani_digital) December 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/oJqk9EGhrK#ViratKohli #India #SouthAfrica #BCCI pic.twitter.com/P27iJnvUSp
ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर : भारतीय संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड मात्र कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळं तो तिसरा एकदिवसीय सामनाही खेळू शकला नव्हता. 19 डिसेंबर रोजी झालेल्या दुखापतीतून तो अजूनही सावरु शकलेला नाही. यामुळं त्याला संघ व्यवस्थापनानं त्याला जाण्याची परवानगी दिलीय.
भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टिरक्षक)
हेही वाचा :