ETV Bharat / sports

फक्त 642 चेंडू अन् खेळ खल्लास! भारतानं तिसऱ्यांदा दोन दिवसात जिंकला कसोटी सामना, पहिले दोन कोणते? - कसोटी सामना

IND vs SA Shortest Test : गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटी सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला. जो केवळ 107 षटकांमध्ये म्हणजेच 642 चेंडूंमध्ये आणि दोन दिवसात संपला. या विजयासह, केपटाऊनच्या न्यू लँड्स स्टेडियमवर विजयाची नोंद करणारा भारत पहिला आशियाई संघ बनलाय.

IND vs SA Shortest Test
IND vs SA Shortest Test
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 8:00 AM IST

केपटाऊन IND vs SA Shortest Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना (चेंडूंच्या बाबतीत) ठरलाय. हा कसोटी सामना दोन दिवस आणि फक्त 107 षटकात म्हणजे 642 चेंडूत संपला.

केपटाऊनला कसोटी जिंकणारा पहिला आशियाई देश : भारतीय संघानं गुरुवारी केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. यासह भारत या मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ बनलाय. या मैदानावर भारताचा हा पहिलाच कसोटी विजय होता आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अखेर न्यूलँड्सचा बालेकिल्ला त्यांनी मोडून काढलाच.

भारतीय संघाचा तिसऱ्यांदा दोन दिवसात विजय : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सुरुवातीपासून 1882 ते 1946 पर्यंत केवळ 15 कसोटी सामने दोन दिवसात संपलेले आहेत. मात्र 2000 पासून 10 कसोटी सामने दोन दिवसात संपले. इंग्लंडमधील लीड्स, संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा आणि अबू धाबी, झिम्बाब्वेमधील हरारे, भारतातील अहमदाबाद आणि बंगळुरु, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन (2) आणि पोर्ट एलिझाबेथ या सर्वांनी दोन दिवसीय कसोटी पाहिल्या आहेत. दोन दिवसीय कसोटीत भारताचा सहभाग असण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी 2018 मध्ये बंगळुरुमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आणि 2021 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचे कसोटी सामने दोन दिवसात संपले होते.

दुसऱ्यांदा मालिकेत बरोबरी : या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरोबरी करणारा दुसरा भारतीय संघ ठरलाय. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवली होती.

सर्वात कमी कालावधीत संपलेले कसोटी सामने :

642 चेंडू - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024
656 चेंडू - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932
672 चेंडू - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, 1935
788 चेंडू - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1888
792 चेंडू - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888.

दोन दिवसात संपणारे कसोटी सामने (गुरुवारचा सामना सोडून) :

  1. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल 1882 : हा इतिहासातील नववा कसोटी सामना होता. ऑस्ट्रेलियाचा डाव 63 धावांत गडगडला, पण फ्रेड डेमन स्पॉफॉर्थच्या सात विकेट्सच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात 101 धावांत रोखण्यात यश आलं. ह्यू मॅसीच्या 55 धावा असूनही ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात केवळ 122 धावाच करू शकला. डब्ल्यूजी ग्रेसच्या 32 धावा असूनही इंग्लंडनं स्पॉफॉर्थसमोर गुडघे टेकले. स्पॉफॉर्थनं 44 धावांत 7 गडी बाद केल्यामुळं इंग्लंडचा डाव 77 धावांत गारद झाला आणि त्यांचा सात धावांनी पराभव झाला.
  2. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स 1888 : ऑस्ट्रेलियानं दोन डावात 116 आणि 60 धावा केल्या आणि त्यानंतर इंग्लंडला 53 आणि 62 धावांत गुंडाळलं आणि 61 धावांनी विजय मिळवला.
  3. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल 1888 : यावेळी इंग्लंडला दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव करण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाचा डाव 80 आणि 100 धावांवर बाद झाला तर यजमानांनी त्यांच्या एकमेव डावात 317 धावा केल्या होत्या.
  4. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर 1888 : प्रथम फलंदाजी करताना डब्ल्यूजी ग्रेसच्या 38 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 172 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात 100 धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्यांनी आपल्या दोन्ही डावात 81 आणि 70 धावा केल्या आणि सामना एक डाव आणि 21 धावांनी गमावला.
  5. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ 1889 : कालांतरानं क्रिकेट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सोडून एका नवीन स्थानावर पोहोचलं. पोर्ट एलिझाबेथमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 84 आणि 129 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडनं 2 बाद 67 आणि 148 धावा केल्या आणि आठ गडी राखून विजय मिळवला.
  6. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन, 1889 : मालिकेतील दुसरा सामनाही दोन दिवसांत संपला. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना बॉबी अबेलच्या 120 धावांच्या जोरावर त्यांच्या एकमेव डावात 292 धावा केल्या. जॉनी ब्रिग्जनं 17 धावांत 7 आणि 11 धावांत 8 बळी घेत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी उद्ध्वस्त केली. यजमान संघाला दोन डावात केवळ 47 आणि 43 धावा करता आल्या आणि इंग्लंडनं एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला.
  7. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल 1890 : ऑस्ट्रेलियन संघानं 92 आणि 102 धावा केल्या आणि इंग्लंडनं आठ विकेट्सवर 95 आणि 100 धावा केल्या. सामन्यात दोन दिवसांत दोन विकेट्स राखून विजय मिळवला.
  8. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ, 1896 : इंग्लंडनं 185 आणि 226 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 93 आणि 30 धावांत गारद केलं. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉर्ज लोहमननं 9.4 षटकांत अवघ्या सात धावांत आठ विकेट घेतल्यानं इंग्लंडनं 288 धावांनी विजय मिळवला.
  9. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन 1896 : आर्थर हिलच्या 124 धावांच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या 115 धावांना प्रत्युत्तर देताना 265 धावा केल्या. इंग्लंडनं दुसऱ्या डावात यजमान संघाला 117 धावांत गुंडाळत एक डाव आणि 33 धावांनी विजय मिळवला.
  10. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मँचेस्टर 1912 : इंग्लंडचा समावेश असलेल्या तिरंगी कसोटी मालिकेत, ऑस्ट्रेलियानं आपल्या एकमेव डावात 448 धावा केल्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 265 आणि 95 धावांत गुंडाळलं. हा सामना एक डाव आणि 88 धावांनी जिंकला.
  11. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओव्हल 1912 : तिरंगी मालिकेतील पुढील सामन्यात सिडनी बार्न्स आणि फ्रँक वूली यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्यानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 95 धावांत आटोपला. जॅक हॉब्सनं इंग्लंडच्या पहिल्या डावात 176 पैकी 68 धावा केल्या. बार्न्सनं दुसऱ्या डावात 29 धावांत आठ विकेट्स घेतल्या, त्यामुळं दक्षिण आफ्रिकेचा डाव 93 धावांत आटोपला आणि इंग्लंडनं 14 धावा करत 10 गडी राखून सामना जिंकला.
  12. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नॉटिंगहॅम, 1921 : इंग्लंडला दोन्ही डावात केवळ 112 आणि 147 धावा करता आल्या, त्याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघानं 232 आणि बिनबाद 30 धावा करत 10 गडी राखून विजय मिळवला.
  13. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज, मेलबर्न 1931 : सर डॉन ब्रॅडमनच्या 152 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या 99 धावांना प्रत्युत्तर देताना आठ गड्यांच्या मोबदल्यात 328 धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 107 धावांत आटोपला. यात यजमानांनी एक डाव आणि 122 धावांनी विजय मिळवला.
  14. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग 1936 : दक्षिण आफ्रिकेचा संघ 157 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्या डावात 439 धावा केल्या, ज्यात जॅक फिंगलटननं 108 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 98 धावांत सर्वबाद झाला. लेगस्पिनर क्लेरी ग्रिमेटने 40 धावांत सात बळी घेतलं. ऑस्ट्रेलिया संघानं एक डाव आणि 184 धावांनी विजय मिळवला.
  15. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेलिंग्टन 1946 : न्यूझीलंडचा संघ आपल्या दोन्ही डावात 42 आणि 54 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियानं आपला एकमेव डाव 199 धावांवर आठ विकेट्सवर घोषित करत एक डाव आणि 103 धावांनी विजय मिळवला.
  16. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, लीड्स 2000 : पहिल्या डावातील वेस्ट इंडिजच्या 172 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनं 272 धावा केल्या. यानंतर त्यांनी कॅरेबियन संघाला 61 धावांत गुंडाळलं. यात अँडी कॅडिक आणि डॅरेन गफ यांनी मिळून नऊ बळी घेतले. परिणामी इंग्लंडनं एक डाव आणि 39 धावांनी विजय मिळवला.
  17. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, शारजाह 2002 : महान लेगस्पिनर शेन वॉर्ननं दोन्ही डावांत आठ विकेट घेतल्यानं पाकिस्तानचा संघ 59 आणि 53 धावांत सर्वबाद झाला. मॅथ्यू हेडनच्या 119 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं आपल्या एकमेव डावात 319 धावा करत या सामन्यात एक डाव आणि 198 धावांनी विजय मिळवला.
  18. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, केप टाउन 2005 : दक्षिण आफ्रिकेनं आपल्या शेजारी राष्ट्राला दोन डावांत 54 आणि 265 धावांत गुंडाळलं. यानंतर तीन विकेट्स 340 धावांवर आपला एकमेव डाव घोषित केला. यामन्यात एक डाव आणि 21 धावांनी विजय मिळवला.
  19. झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड, हरारे 2005 : ब्रेंडन मॅक्युलम आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या शतकांमुळं न्यूझीलंडनं नऊ विकेट्स 452 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 55 आणि 99 धावांवर संपुष्टात आणला आणि सामना 294 धावांनी जिंकला.
  20. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे, पोर्ट एलिझाबेथ 2017 : प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं नऊ गड्यांच्या मोबदल्यात 309 धावा करुन डाव घोषित केला. यानंतर त्यांनी झिम्बाब्वेला 68 आणि 121 धावांवर बाद केलं, ज्यामुळं यजमान संघानं सामन्यात एक डाव आणि 120 धावांनी विजय मिळवला.
  21. भारत विरुद्ध अफगाणिस्तान, बंगळुरु 2018 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतानं सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांच्या शतकांच्या जोरावर 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 109 आणि 103 धावा करु शकला आणि त्यांना एक डाव आणि 262 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
  22. भारत विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद 2021 : फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंडनं 112 आणि 81 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 145 आणि 49 धावा एकही विकेट न गमावता केल्या. सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला.
  23. अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, अबू धाबी 2021 : झिम्बाब्वेनं अफगाणिस्तानला 131 आणि 135 धावांत गुंडाळलं. प्रत्युत्तरात 250 आणि बिनबाद 17 धावा करत 10 गडी राखून विजय मिळवला.
  24. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ब्रिस्बेन 2022 : गाब्बा येथे दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन डावांत 152 आणि 99 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन संघानं 218 धावा आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा करत सहा गडी राखून विजय मिळवला.

हेही वाचा :

  1. लाजिरवाणं! 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं
  2. आफ्रिकेचा कर्णधार एल्गार शेवटच्या सामन्यात बाद होताच कोहलीनं केली अशी कृती, पाहून म्हणाल व्वा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.