ETV Bharat / sports

भारत-दक्षिण आफ्रिका टी २० सामना; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला धावला पाऊस, भारताचा पराभव

IND Vs SA T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी टीम इंडियाच्या १९.३ षटकात १८०-७ धावा झाल्या होत्या. भारताकडून खेळताना सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंहनं अर्धशतक फटकावलं. मात्र पावसाच्या मदतीनं दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकला.

IND Vs SA T20
IND Vs SA T20
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 10:39 PM IST

Updated : Dec 13, 2023, 8:21 AM IST

गकेबरहा (द. आफ्रिका) IND Vs SA T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दुसरा टी २० सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या १९.३ षटकात १८०-७ धावा झाल्या आहेत. भारताच्या डावाला ३ चेंडू बाकी असताना पावसानं खोळंबा घातला. त्यामुळे डकवर्थ लुईस पद्धतीनं दक्षिण आफ्रिका संघाला 15 षटकात 152 धावांचं आव्हान देण्यात आलं. मात्र हे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी 13.5 षटकात पूर्ण करत भारतावर विजय मिळवला.

भारताची खराब सुरुवात : प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर (शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल) भोपळाही न फोडता तंबूत परतले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्मानं २० चेंडूत २९ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनं दमदार फटकेबाजी केली. त्याला टीम इंडियाचा नवा फिनिशर रिंकू सिंहनं चांगली साथ दिली. सूर्या ३६ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. रिंकू सिंह ३९ चेंडूत ६८ धावा ठोकून क्रिजवर नाबाद होता.

पहिला सामना पावसामुळे रद्द : या सामन्यात भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडं आहे, तर दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व एडन मार्करम करतोय. भारताला हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी २० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण २५ टी २० सामने खेळले गेलेत. यापैकी भारतानं १२ जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेनं १० सामन्यात विजय मिळवला. दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :

दक्षिण आफ्रिका - मॅथ्यू ब्रेट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी

भारत - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

हेही वाचा :

  1. अंडर १९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कोण आहे कर्णधार
  2. अबब! बीसीसीआयकडे किती ही संपत्ती, इतर देश आसपासही नाहीत; जाणून घ्या टॉप १० लिस्ट
  3. पावसानं केला घोळ, भारत-दक्षिण आफ्रिका सामना टॉस न होताच रद्द

Last Updated : Dec 13, 2023, 8:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.