रायपूर : रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडला 108 वर चितपट केले. मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेत न्यूझीलंडच्या संघाला गारद केले. यानंतर भारताने 20.1 षटकात 2 गडी गमावून न्यूझीलंड संघावर विजय मिळवला. भारताकडून रोहित शर्माने अर्धशतक झळकावत 51 धावा केल्या.
न्यूझीलंडचा डाव 108 धावांत गार - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये झाला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्याप्रमाणेचे दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेक जिंकली. रायपूरमधील खेळपट्टीचा विचार करून रोहितने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळताभुई थोडी केली. न्यूझीलंडचा डाव 108 धावांवरच आटोपला. तर भारतासमोर 109 धावाचे आव्हान न्यूझीलंड संघाने ठेवले.
लाजिरवाण्या विक्रमाची नोंद - न्यूझीलंड संघाचे ५ फलंदाज अवघ्या १५ धावांवर गारद झाले होते. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ५ खेळाडू इतक्या स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे या संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला होता. पहिला सामना जिंकून भारत १-० ने आघाडीवर आहे. जर भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तर तो घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सलग सातवी वनडे मालिका जिंकेल. न्यूझीलंडला आतापर्यंत भारतात एकही वनडे मालिका जिंकता आलेली नाही. याआधी दोन्ही संघांदरम्यान भारतीय भूमीवर सहा एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये भारताने सर्व जिंकले आहेत.
रायपूरमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना : 49,000 प्रेक्षक क्षमता असलेले रायपूरचे शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियम एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे भारतातील 50 वे ठिकाण बनणार आहे. या स्टेडियम वर 2013 आणि 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) चे दोन IPL सामने आयोजित केले होते आणि चॅम्पियन्स लीग T20 चे आठ सामने देखील आयोजित केल्या गेले होते.
भारतीय संघापुढील आव्हान : भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर संघात अजूनही काही त्रुटी आहेत ज्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ दुरुस्त करू इच्छितो. विरोधी संघाला फलंदाजीच्या बळावर सामन्यात वापसी करण्यापासून रोखने हे भारतीय संघापुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यांच्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये, भारतीय संघाने मेहदी हसन मिराज, दासुन शनाका आणि मागील सामन्यात ब्रेसवेल सारख्या फलंदाजांना शतके झळकावण्याची संधी दिली आहे.
न्यूझीलंडच्या नवख्या गोलंदाजांवर जबाबदारी : अनुभवी गोलंदाज टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत, न्यूझीलंडच्या नवख्या गोलंदाजांवर चांगली कामगिरी जबाबदारी आहे. हेन्री शिपले, ब्लेअर टिकनर आणि लॉकी फर्ग्युसन हे पहिल्या सामन्यात महागडे ठरले होते. लेगस्पिनर ईश सोधी जर दुखापतीतून सावरला असेल, तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाची जागा घेतो हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.
खेळपट्टीचा अहवाल : रायपूरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना निराश करू शकते. त्यामुळे येथे फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यासाठी गोलंदाजांना त्यांच्या विविध कलांवर अवलंबून राहावे लागेल. मात्र, चेंडू जुना होताच येथे फिरकीपटूंना मोठी मदत मिळू लागेल. खेळ जसजसा पुढे जाईल तसतसा या ठिकाणी फलंदाजी करणे सोपे होईल. त्यामुळे रायपूरमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणे कोणत्याही संघाला आवडेल.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपले.
हेही वाचा : Ronaldo vs Messi : मेस्सी आणि रोनाल्डो आमने-सामने, अमिताभ बच्चन यांनी दोघांचीही घेतली भेट