ETV Bharat / sports

IND vs IRE 1st T20: 139 धावांचे आव्हान असूनही 'टीम इंडिया' फक्त 47 धावा करुन जिंकली; बुमराह ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच' - player of the match

आयर्लंडविरुद्धच्या 3 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी 20 सामना 'टीम इंडिया'नं जिंकलाय. डकवर्थ लुईस नियमांनुसार 'टीम इंडिया'नं 2 धावांनी हा सामना जिंकला. आयर्लंड संघानं 'टीम इंडिया'समोर 140 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान पार करताना टीम इंडियानं 47 धावा करत सामना जिंकला. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहला या सामन्यात 'सामनावीर' म्हणून घोषित करण्यात आलं.

बुमराह झाला प्लेअर ऑफ द मॅच
बुमराह झाला प्लेअर ऑफ द मॅच
author img

By

Published : Aug 19, 2023, 10:22 AM IST

Updated : Aug 19, 2023, 12:11 PM IST

डब्लिन : भारत आणि आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी 20 क्रिकेट मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना टीम इंडियानं जिंकलाय. आयर्लंड संघानं भारतासमोर 140 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 'टीम इंडिया'नं फक्त 47 धावा करत हा सामना जिंकला. आता तुम्ही म्हणाल, समोरील संघानं 140 धावांचं आव्हान दिलं तरीही 47 धावा करणारा संघ कसा जिंकणार? पण त्याचं असं झालं की, पहिल्या टी20 सामन्यावेळी पाऊस आला आणि आयर्लंडनं सामना गमावला.

टीम कशी जिंकली : कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना आयर्लंडनं भारतासमोर 140 धावांचं आव्हान उभं केलं. भारतीय संघ धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. भारतानं दमदार सुरुवात केली. सहा षटकांमध्ये भारताचा एकही गडी बाद झाला नव्हता. या षटकापर्यंत 'टीम इंडिया'ची स्थिती बिनबाद 45 धावा अशी होती. पण 7 व्या षटकात यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माच्या विकेट गेल्या. त्यादरम्यान पाऊस सुरू झाला. 7व्या षटकातील 5 चेंडू टाकले गेल्यानंतर पंचांनी पावसामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतानं 2 गडी गमावत 47 धावा केल्या होत्या. त्यावेळी 'डकवर्थ लुईस' नियमांनुसार 'टीम इंडिया'ला विजयी घोषित करण्यात आलं.

डकवर्थ लुईस नियम : भारताची फलंदाजी चालू असताना 7 व्या षटकावेळी पाऊस सुरू झाला. पावसामुळे पंचांनी सामना थांबवला. त्यानंतर 'डकवर्थ लुईस' नियम लावण्यात आला. 'टीम इंडिया'नं 7 व्या षटकापर्यंत 2 गडी गमावत 47 धावा केल्या होत्या. जर 7 षटकांमध्ये भारतानं 2 गडी गमावून 46 धावा केलेल्या असत्या तर आयर्लंड विजयी ठरला असता. तर 6.5 षटकाचा खेळ झालेला असताना सामना थांबवला असता, तर भारताच्या 45 धावा राहिल्या असत्या. पण सामना थांबवला तेव्हा भारतानं 2 गडी गमावत 47 धावा केल्या होत्या. दोन धावा जास्त असल्यानं भारताला विजयी घोषित करण्यात आलं.

'सामनावीर' बुमराह : भारत आणि आयर्लंडच्या संघामध्ये तीन 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडं सोपवण्यात आली आहे. दुखापतीतून सावरलेला बुमराह प्रदीर्घ काळानंतर म्हणजे तब्बल 327 दिवसानंतर 'टीम इंडिया'त परतला ते थेट 'कर्णधार' म्हणून! बुमराहनं सामन्याच्या पहिल्याच षटकात आयर्लंडचे दोन गडी बाद करत जबरदस्त धक्का दिला. त्याच्या या कामगिरीची दखल 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारानं घेण्यात आली. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून 'टीम इंडिया'ने 1 -0 अशी आघाडी घेतली आहे.

बुमराहनं या सामन्यात 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. यासह बुमराहानं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आर अश्विनची बरोबरी केली आहे. बुमराहनं या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 72 विकेटस् घेतल्या. अश्विननेही आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 72 विकेटस् घेतल्या आहेत. बुमराह टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा-

  1. India Vs Ireland : आयर्लंडविरुद्ध टी २० सामन्यात बुमराहच्या नेतृत्वाची कसोटी, प्लेइंग ११ मध्ये यांना मिळू शकते संधी
  2. Rishabh Pant : अखेर पंत मैदानात परतला! कार अपघातानंतर प्रथमच खेळला क्रिकेट; Watch Video

Last Updated : Aug 19, 2023, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.