ETV Bharat / sports

Ind vs Eng : पॉल कॉलिंगवूड यांनी भारतीय संघाच्या वापसीबद्दल काय म्हटलं? - इंग्लंड

आम्ही भारताच्या वापसीसाठी तयार आहोत. आम्हाला कल्पना आहे भारतीय संघ कसा आहे. ते पाहता आम्ही स्वत:ला तयार करत आहोत, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनी दिली.

Ind vs Eng : We are preparing ourselves for an Indian fightback: Paul Collingwood
Ind vs Eng : पॉल कॉलिंगवूड यांनी भारतीय संघाच्या वापसीबद्दल काय म्हटलं?
author img

By

Published : Aug 31, 2021, 7:01 PM IST

लंडन - भारतीय संघाचा लीड्स कसोटी सामन्यात दारूण पराभव झाला. यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवर जोरदार टीका होत आहे. अशात ते गुरूवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात कडवी झुंज देऊ शकतात. यामुळे आम्ही स्वत:ला तयार करत आहोत, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनी दिली. दरम्यान, भारताचा लीड्स कसोटी सामन्यात एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला होता. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

पॉल कॉलिंगवूड यांनी भारताच्या मोजक्या पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बातचित केली. यात बोलताना ते म्हणाले की, आम्ही चांगली गोलंदाजी केली, असे मला वाटते. तुम्ही जर भारतीय समर्थक असाल तर टीका करणे सोपे आहे. पण पहिल्या दिवशी गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर खेळणे सोप्प नाही.

विराट कोहलीने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितलं की, इंग्लंड संघाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला आणि संधी दिली नाही. आमच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना झुंजावे लागले. यामुळे मला वाटत की, आमची गोलंदाजी सटीक होती, असे देखील पॉल कॉलिंगवूड म्हणाले.

कॉलिंगवूड पुढे म्हणाले की, भारतीय संघ वापसी करू शकेल. मला विश्वास आहे की, आम्ही भारताच्या वापसीसाठी तयार आहोत. आम्हाला कल्पना आहे भारतीय संघ कसा आहे. ते पाहता आम्ही स्वत:ला तयार करत आहोत. ओव्हलमध्ये नव्या आव्हानासाठी आम्ही शंभर टक्के तयार होऊ.

लॉर्डस् मध्ये जे झाले ते पाहता आम्ही हेडिंग्लेत शानदार प्रदर्शन केल्याचे देखील पॉल कॉलिंगवूड यांनी सांगितलं. कॉलिंगवूड यांनी इंग्लंडसाठी 68 कसोटी सामने खेळली आहेत. दरम्यान, उभय संघातील चौथ्या सामन्याला 2 सप्टेंबरपासून होणार आहे.

हेही वाचा - BCCI ने नव्या IPL संघासाठी तब्बल 'इतक्या' कोटीची बेस प्राईस केली निश्चित

हेही वाचा - अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची क्रिकेटमधून निवृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.