नॉटिंघम - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण या सामन्यात मोहम्मद सिराज एक नाही तर दोन इंग्लंडच्या खेळाडूंसी वाद घालताना पाहायला मिळाला. त्याने पहिलं डोमिनिक सिब्लीशी पंगा घेतला. त्यानंतर तो जेम्स अँडरसनशी भिडला.
पहिल्या डावात भारतीय संघाने इंग्लंडवर 90 धावांची आघाडी घेतली. त्याच वेळी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज खूप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सिराज इंग्लंडचा सलामीवीर डोमिनिक सिब्लीशी वाद घालताना दिसला. सिब्लीने सिराजला चौकार मारताच सिराजला राग आला आणि तो फलंदाजाला स्लेजिंग करताना दिसला. सिराज सतत डोमिनिक सिब्लीला चिथवण्याचा प्रयत्न करत होता.
-
#IndvsEng #ENGvsIND pic.twitter.com/PwNNNDa5DL
— Prabhat Sharma (@PrabS619) August 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#IndvsEng #ENGvsIND pic.twitter.com/PwNNNDa5DL
— Prabhat Sharma (@PrabS619) August 7, 2021#IndvsEng #ENGvsIND pic.twitter.com/PwNNNDa5DL
— Prabhat Sharma (@PrabS619) August 7, 2021
याआधी सिराज जेम्स अँडरसनशी भिडला. जेम्स अँडरसन भारताची शेवटची विकेट काढण्यात अपयशी ठरू लागला, तेव्हा तो निराश झाला आणि त्याने मोहम्मद सिराजला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. सिराजला त्याचे शब्द आवडले नाहीत आणि मग त्याने जिमीला उत्तर दिले. पण हे प्रकरण तिथल्या तिथे शांत झाले. पण त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
Mohammed Siraj sledging Jimmy Anderson 😂 #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwani45singh) August 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mohammed Siraj sledging Jimmy Anderson 😂 #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwani45singh) August 6, 2021Mohammed Siraj sledging Jimmy Anderson 😂 #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwani45singh) August 6, 2021
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी सुरू आहे. या सामन्यात भारताचे चांगली पकड निर्माण केली आहे. भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावात ऑलआउट केलं. त्यानंतर 278 धावा करत 90 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने दुसऱया डावात 303 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चौथ्या दिवसाअखेर 1 बाद 52 धावा केल्या आहेत. भारताला अखेरच्या दिवशी 157 धावांची गरज आहे.
हेही वाचा - नीरज चोप्राविषयी पाकिस्तानी भालाफेकपटूने काय लिहलं की, ज्यामुळे त्याला ट्विट डिलिट कराव लागलं
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं बक्षिस