बर्मिंगहॅम : रवींद्र जडेजाच्या 104 धावांच्या खेळीनंतर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या ( Captain Jaspreet Bumrah ) नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत आपली पकड घट्ट केली आहे. मालिकेतील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात शनिवारी दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लंडने 27 षटकांत पाच बाद 84 धावा केल्या.
-
If it was @RishabhPant17 who scored a cracking ton on Day 1, it was @imjadeja who completed a solid hundred on Day 2. 👏 👏 #TeamIndia | #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/s4UdGUYUWB
">If it was @RishabhPant17 who scored a cracking ton on Day 1, it was @imjadeja who completed a solid hundred on Day 2. 👏 👏 #TeamIndia | #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 2, 2022
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/s4UdGUYUWBIf it was @RishabhPant17 who scored a cracking ton on Day 1, it was @imjadeja who completed a solid hundred on Day 2. 👏 👏 #TeamIndia | #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 2, 2022
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/s4UdGUYUWB
पहिल्या डावात भारताच्या 416 धावांना ( India first innings 416 ) प्रत्युत्तर देताना इंग्लंडने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 बाद 84 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार बेन स्टोक्स (0) सह जॉनी बेअरस्टो (12) क्रीजवर उपस्थित होते. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडचा संघ अजूनही भारताच्या 332 धावांनी मागे आहे.जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करताना इंग्लंडच्या डावाला सुरुवातीपासून सुरुंग लावला, ज्यामध्ये त्याने पहिल्या तीन विकेट घेतल्या. पहिल्या अॅलेक्स लीसला तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने क्लीन बोल्ड केले, तर जॅक क्रॉलीला बुमराहच्या बाहेर जाणारा चेंडू समजू शकला नाही आणि त्याने शुभमन गिलकडे सोपा झेल दिला.
-
That's Stumps on Day 2 of the #ENGvIND Edgbaston Test! #TeamIndia put on a fantastic show with the ball, scalping 5 England wickets, after posting 416 on the board. 👏 👏
— BCCI (@BCCI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We will be back for Day 3 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM pic.twitter.com/Q2kLIFR7O0
">That's Stumps on Day 2 of the #ENGvIND Edgbaston Test! #TeamIndia put on a fantastic show with the ball, scalping 5 England wickets, after posting 416 on the board. 👏 👏
— BCCI (@BCCI) July 2, 2022
We will be back for Day 3 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM pic.twitter.com/Q2kLIFR7O0That's Stumps on Day 2 of the #ENGvIND Edgbaston Test! #TeamIndia put on a fantastic show with the ball, scalping 5 England wickets, after posting 416 on the board. 👏 👏
— BCCI (@BCCI) July 2, 2022
We will be back for Day 3 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM pic.twitter.com/Q2kLIFR7O0
या दोघांनंतर बुमराहनेही ओली पोपला आपला शिकार बनवले. पोप 10 धावा करून बाद झाला. ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारा जसप्रीतचा चेंडू मारण्यापासून पोप स्वत;ला रोखू शकला नाही आणि स्लीपमध्ये उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने त्याचा झेल घेतला. तत्पूर्वी, सामन्याच्या दुस-या दिवशी बुमराहनेही फलंदाजी करताना आश्चर्यकारक कामगिरी केली होती.
जसप्रीत बुमराहची वादळी खेळी -
-
Stuart Broad to @Jaspritbumrah93 the batter💥💥
— BCCI (@BCCI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
An over to remember! A record shattering over! #ENGvIND pic.twitter.com/l9l7lslhUh
">Stuart Broad to @Jaspritbumrah93 the batter💥💥
— BCCI (@BCCI) July 2, 2022
An over to remember! A record shattering over! #ENGvIND pic.twitter.com/l9l7lslhUhStuart Broad to @Jaspritbumrah93 the batter💥💥
— BCCI (@BCCI) July 2, 2022
An over to remember! A record shattering over! #ENGvIND pic.twitter.com/l9l7lslhUh
पहिल्या चेंडूवर बुमराहने फाइन लेगवर चौकार मारला. त्यानंतर ब्रॉडचा बाऊन्सर चेंडू यष्टिरक्षक सॅम बिलिंग्जच्या ( Wicketkeeper Sam Billings ) अंगावर गेला आणि एकूण पाच धावा झाल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सात धावा झाल्या कारण बुमराहने थर्ड मॅनवर षटकार मारला आणि त्याला नो बॉलमध्ये एक धाव मिळाली. यानंतर बुमराहने सलग तीन चौकार मारले. त्यानंतर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार मारून एका षटकांत 34 धावा कुटल्या. शेवटच्या चेंडूवर ब्रॉडला थोडा दिलासा मिळाला कारण बुमराह यॉर्कर चेंडूवर फक्त एकच धाव घेऊ शकला.
भारताने पहिल्या डावात केल्या 416 धावा -
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावा ( India first innings scored 416 ) केल्या. पंतने केवळ 111 चेंडूत 146 धावांची शानदार खेळी खेळली. पंतने या खेळीत 20 चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी रवींद्र जडेजानेही शानदार कामगिरी करताना 104 धावा केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी केली. कर्णधार जसप्रीत बुमराह 16 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला.
-
It continues to rain 🌧️ & the Tea 🫖 has been taken on Day 2 of the Edgbaston Test!
— BCCI (@BCCI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Captain @Jaspritbumrah93 leading the charge with the ball for #TeamIndia. 👏 👏 #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKK7LU pic.twitter.com/qiTcDloaoR
">It continues to rain 🌧️ & the Tea 🫖 has been taken on Day 2 of the Edgbaston Test!
— BCCI (@BCCI) July 2, 2022
Captain @Jaspritbumrah93 leading the charge with the ball for #TeamIndia. 👏 👏 #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKK7LU pic.twitter.com/qiTcDloaoRIt continues to rain 🌧️ & the Tea 🫖 has been taken on Day 2 of the Edgbaston Test!
— BCCI (@BCCI) July 2, 2022
Captain @Jaspritbumrah93 leading the charge with the ball for #TeamIndia. 👏 👏 #ENGvIND
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKK7LU pic.twitter.com/qiTcDloaoR