ETV Bharat / sports

Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी का रद्द झाली?, सौरव गांगुलींनी दिलं स्पष्टीकरण - भारतीय संघ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामना रद्द करण्यात आला. याविषयावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी आयपीएलचा या सामन्याशी काही एक संबंध नसल्याचे सांगितलं.

indian-players-refused-to-play-in-the-fifth-test-due-to-corona-concerns-said-Sourav Ganguly
Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी का रद्द झाली?, सौरव गांगुलींनी दिलं स्पष्टीकरण
author img

By

Published : Sep 13, 2021, 5:26 PM IST

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा निर्णायक कसोटी सामना मँचेस्टर येथे रंगणार होता. परंतु या सामन्याच्या नाणेफेकीला 90 मिनिटाचा कालावधी शिल्लक होता. तेव्हा भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला. यामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे ज्यूनियर फिजीयो योगेश पारमार कोरोनाबाधित आढळले. यामुळे भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला. दरम्यान, यानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी आयपीएल 2021 मुळे भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप केला. आता यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

द टेलिग्राफच्या हवाल्याने सौरव गांगुलींनी सांगितलं की, खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. पण तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. फिजिओ योगेश पारमार खेळाडूंच्या संपर्कात आले होते. त्यांनी खेळाडूंचा मसाज देखील केला होता. यामुळे खेळाडूंना कोरोनाची भिती वाटत होती. बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही. खेळाडूंच्या भावनाचा आदर केला पाहिजे.

सामना रद्द करण्याचा संबंध आयपीएलशी नाही. बीसीसीआय कधीही बेजबाबदार बोर्ड राहिलेला नाही. आम्ही इतर बोर्डांना देखील महत्व देतो, असे देखील सौरव गांगुली यांनी सांगितलं. दरम्यान, याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने सांगितलं की, आयपीएल 2021 पूर्वी पॉझिटिव्ह होण्याची भीती भारतीय खेळाडूंना होती. इंग्लंडच्या काही माजी खेळाडूंनी, भारतीय खेळाडूंनी आयपीएल 2021 ला प्राधान्य देत खेळण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा - IPL 2021 : यूएईत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट धोकादायक ठरतील, दिग्गजाची भविष्यवाणी

हेही वाचा - जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.