ETV Bharat / sports

IND vs ENG 5th Test : भारताचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात, जेम्स अँडरसनचे 5 बळी - भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी

भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) यांच्यातील पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 416 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे.

IND vs ENG 5th
IND vs ENG 5th
author img

By

Published : Jul 2, 2022, 8:02 PM IST

बर्मिंगहॅम: एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या ( IND vs ENG 5th Test ) सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 416 धावांवर गडगडला. भारताकडून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. पंतने 146 धावा केल्या, तर जडेजा 104 धावांची शानदार खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 बळी घेतले.

इंग्लंडच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहने अॅलेक्स लीसला बोल्ड करून भारताला पहिले यश मिळवून दिले. पावसाच्या व्यत्ययामुळे दुपारच्या जेवणासाठी वेळेआधी ब्रेक घेण्यात आला होता. उपाहारानंतर लगेचच जॅक क्रॉली 9 धावांवर बाद झाला. इंग्लंडने दोन गडी गमावून 31 धावा केल्या होत्या. जो रूटसोबत ऑली पोप क्रीजवर उपस्थित आहे.

हेही वाचा - Bumrah Break Lara World Record : कर्णधार जसप्रीत बुमराहने केला कहर; एका षटकात तब्बल 35 धावा चोपत रचला विश्वविक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.