मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड संघात आज तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील ( IND vs ENG ODI Series ) तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक आहे. या सामन्याला दुपारी साडेतीनला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरुवात होणार आहे. या सामन्याचा नाणेफेक पार पडला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( India opt to bowl ) आहे.
-
It all boils down to the final one! 👌
— BCCI (@BCCI) July 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We are excited, are you❓#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/tm9ehwvvqH
">It all boils down to the final one! 👌
— BCCI (@BCCI) July 17, 2022
We are excited, are you❓#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/tm9ehwvvqHIt all boils down to the final one! 👌
— BCCI (@BCCI) July 17, 2022
We are excited, are you❓#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/tm9ehwvvqH
भारत आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांची मालिका सद्या 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने 10 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना इंग्लंड संघाने 100 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना ( IND vs ENG 3rd ODI ) निर्णायक होणार आहे. आजच्या सामन्यावरुन मालिकेचा विजेता निश्चित होणार आहे.
ओल्ड ट्रॅफर्डवरील भारताची कामगिरी -
भारताने ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत 11 सामने खेळले ( India performance at Old Trafford ) आहेत, ज्यात 5 जिंकले आहेत आणि सहा गमावले आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड येथे वर्ल्ड चॅम्पियन्सविरुद्ध केवळ एकदाच विजय मिळविल्यानंतर भारत इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या एकहाती विक्रमात सुधारणा करू पाहत आहे. रविवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
भारतीय प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.
-
A look at our Playing XI for the game.
— BCCI (@BCCI) July 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/radUqNrOn1 #ENGvIND pic.twitter.com/TkbzNYfLrw
">A look at our Playing XI for the game.
— BCCI (@BCCI) July 17, 2022
Live - https://t.co/radUqNrOn1 #ENGvIND pic.twitter.com/TkbzNYfLrwA look at our Playing XI for the game.
— BCCI (@BCCI) July 17, 2022
Live - https://t.co/radUqNrOn1 #ENGvIND pic.twitter.com/TkbzNYfLrw
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉप्ली.
-
It's time ⌛
— England Cricket (@englandcricket) July 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The decider at @EmiratesOT
🏴 #ENGvIND 🇮🇳 @RL_Cricket
">It's time ⌛
— England Cricket (@englandcricket) July 17, 2022
The decider at @EmiratesOT
🏴 #ENGvIND 🇮🇳 @RL_CricketIt's time ⌛
— England Cricket (@englandcricket) July 17, 2022
The decider at @EmiratesOT
🏴 #ENGvIND 🇮🇳 @RL_Cricket
हेही वाचा - Singapore Open 2022 : फुलराणीचा नवा विक्रम; सिंधूने पहिल्यांदाच पटकावले सिंगापूर ओपनचे जेतेपद