बंगळुरू Cricket World Cup २०२३ : क्रिकेट वर्ल्डकपचा १८ वा सामना शुक्रवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव केलाय. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ६७२ धावांचा पाऊस पाडला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पाकिस्तानची लोअर मिडल ऑर्डर ढासळली : ३६७ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव ३०५ धावांवर गारद झाला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. पण झांम्पासमोर पाकिस्तानची लोअर मिडल ऑर्डर टिकू शकली नाही. झाम्पाने ५३ धावांत ४ बळी घेतले. वॉर्नर आणि मार्श ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले. वॉर्नरने १६३ धावांची तर मार्शने १२३ धावांची खेळी खेळली. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले आहे.
पाकिस्तानकडूनही जशास तसं उत्तर : पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांनी अर्धशतके ठोकली होती. अब्दुल्लाह शफीक याने 61 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. अब्दुल्लाह शफीक याने संयमी सुरुवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. पाकिस्तानचा अनुभवी सलामी फलंदाज इमाम उल हक याने यंदाच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले.
आतापर्यंतचा काय होता इतिहास काय : या दोन संघांमध्ये आतापर्यंत १०७ एकदिवसीय सामने झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियानं ६९ सामने जिंकले असून, पाकिस्तानला ३४ सामन्यात विजय मिळवता आलाय. विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड चांगला राहिलाय. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १० सामने झाले असून, त्यापैकी ऑस्ट्रेलियानं ६ तर पाकिस्ताननं ४ सामने जिंकले आहेत.
सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित : अफगाणिस्तान आणि नेदरलँड यांनी बलाढ्य संघाचा पराभव करत मोठा उलटफेर केला. त्यामुळे विश्वचषक अधिकच रंजक झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. भारत आणि न्यूझीलंड संघाने सलग चार सामन्यात विजय मिळवलाय. दोन्ही संघाचे आठ आठ गुण आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या संघाची स्थिती नाजूक आहे.
हेही वाचा :