ETV Bharat / sports

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मैदानात घुसलेला पॅलेस्टाईक समर्थक होता तरी कोण? - नरेंद्र मोदी स्टेडियम

Palestine Supporter In Final : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान एक व्यक्ती हातात पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन मैदानात घुसला होता. पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. कोण आहे हा व्यक्ती? आणि त्यानं असं कृत्य का केलं? जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..

Palestine Supporter In Final
Palestine Supporter In Final
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 3:37 PM IST

अहमदाबाद Palestine Supporter In Final : रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यादरम्यान सुरक्षेत मोठी त्रुटी राहिली होती.

अंतिम सामन्यात मैदानात घुसला होता : अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ६००० पोलिसांची तैनाती होती. मात्र भारताच्या डावाच्या १४व्या षटकात एक पॅलेस्टिनी समर्थक ही सुरक्षा व्यवस्था तोडून मैदानात घुसला. त्यानं 'Free Palestine' आणि 'Stop Bombing Gaza' असा संदेश लिहिलेला टी-शर्ट घातला होता. तो सरळ विराट कोहलीकडे धावत गेला आणि त्यानं कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या पॅलेस्टाईन समर्थकानं तोंडावर मास्क लावला होता आणि हातात पॅलेस्टाईनचा ध्वज धरला होता.

गुन्हा दाखल : या घटनेनंतर पोलिसांच्या कामगिरीवर आणि सुरक्षेवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. मैदानावरील पोलिसांनी या व्यक्तीला लगेच ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याच्यावर चांदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास अहमदाबाद गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. चौकशीदरम्यान हा व्यक्ती कोण आहे? तो कुठून आला? याबाबतची सर्व माहिती समोर आली आहे.

कोण आहे हा व्यक्ती : 'व्हॅन जॉन्सन' असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचं नाव आहे. तो सिडनीचा रहिवासी असून तो विराट कोहलीला भेटण्यासाठी आला होता. व्हॅन जॉन्सनचे वडील जॅन्झोन हे चिनी वंशाचे आहेत, तर त्याची आई मर्लिन फिलीपीन वंशाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो एका सोलर पॅनल कंपनीत काम करतो. याशिवाय तो टिक-टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील फार सक्रिय आहे.

या आधीही असं कृत्य केलंय : पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, व्हॅन जॉन्सननं याआधी फिफा महिला वर्ल्ड कप फायनलमध्येही असंच कृत्य केलं होतं. त्या सामन्यादरम्यान त्यानं 'फ्री युक्रेन' असं लिहिलेला टी-शर्ट घालून मैदानात प्रवेश केला होता. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ पकडलं. त्यानंतर त्याला ५०० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. व्हॅन जॉन्सनचा युक्रेनशी कोणताही संबंध नव्हता. तरीही त्यानं 'फ्री युक्रेन' लिहिलेला टी-शर्ट घालून मैदानात धिंगाणा घातला आणि तो प्रसिद्ध झाला.

प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू : याशिवाय, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील सन कॉर्प स्टेडियममध्ये २०२० स्टेट ऑफ ओरिजिन ३ रग्बी सामन्यादरम्यान व्हॅन जॉन्सननं खेळाडूच्या ड्रेस कोडमध्ये मैदानात प्रवेश केला होता. रग्बी सामन्यात अशा कृतीसाठी ऑस्ट्रेलियन कोर्टानं त्याला २०० डॉलर्सचा दंड ठोठावला होता. व्हॅन जॉन्सनचा स्वत:चा कोणत्याही आंतरराष्ट्रीय मुद्द्याशी संबंध नसला, तरी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सामन्यांच्या वेळी स्टेडियमच्या मैदानांवर अतिक्रमण करून प्रसिद्धी मिळवणं हा त्याचा हेतू असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :

  1. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घुसला पॅलेस्टाईन समर्थक, विराटला भेटायला गेला थेट खेळपट्टीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.