ETV Bharat / sports

बरं झालं भारत टॉस हारला, नाणेफेकीवरून वसीम अक्रमची मजेशीर प्रतिक्रिया - क्रिकेट विश्वचषक

Wasim Akram Toss : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु आहे. भारतानं या सामन्यात नाणेफेक गमावली. यापूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या नाणेफेकीच्या पद्धतीवरून वाद निर्णाण झाला होता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Wasim Akram
Wasim Akram
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 3:24 PM IST

नवी दिल्ली Wasim Akram Toss : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्यात नाणेफेक हरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यावरून आता पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रम यानं एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला वसीम अक्रम : येथे आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही सामन्यांपासून रोहित शर्माच्या नाणेफेकीवरून वाद सुरू होता. पाकिस्तानचे काही खेळाडू आणि क्रिकेट पंडितांनीही यावर आक्षेप घेतला होता. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमनं एका स्पोर्ट्स चॅनलवर सांगितलं की, आता लोकं म्हणतील की, नाणं प्रायोजक लोगोवर उतरल्यामुळं भारतानं टॉस गमावला. वसीम अक्रमनं एकप्रकारे हा आपल्या देशवासीयांनाच टोला लगावलाय.

न्यूझीलंड क्रिकेटनं आक्षेप घेतला होता : अंतिम सामन्यापूर्वी उपांत्य फेरीदरम्यान न्यूझीलंड क्रिकेटनं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या टॉसच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले होते. न्यूझीलंड क्रिकेटच्या मते, रोहित ज्या पद्धतीनं नाणेफेक करतो आणि संपूर्ण स्पर्धेत त्यानं जशी नाणेफेक केली यावर त्यांचा आक्षेप आहे. न्यूझीलंडच्या सामन्याबाबत पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्त म्हणाला होता की, रोहित शर्मानं जाणूनबुजून नाणं अशा प्रकारे फेकलं की न्यूझीलंडच्या कर्णधाराला ते दिसू नये. तो म्हणाला की, रोहित शर्माची सवय आहे की तो कॉईन अशा प्रकारे फेकतो की विरोधी संघाच्या कर्णधाराला काय झालं ते कळत नाही.

उपांत्य सामन्यापूर्वी वाद : विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापूर्वी आणखी एक वाद निर्माण झाला होता. मॅचसाठी ताज्या खेळपट्टीऐवजी वापरलेल्या खेळपट्टीचा वापर करण्यासाठी बीसीसीआयनं आयसीसीवर दबाव आणल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, असं असतानाही भारतानं आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत.

हेही वाचा :

  1. भारतीय संघ फायनल जिंकला की म्हणताल मोदींमुळेच जिंकलो- संजय राऊत यांनी श्रेयवादावरून भाजपाची उडविली खिल्ली
  2. अंतिम सामन्यात फलंदाजाला शतक झळकावणं असतं महाकठीण, आजपर्यंत केवळ 'या' सहा फलंदाजांनी केली कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.