ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : द. आफ्रिकेचं पारडं जड, बांग्लादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय - Bangladesh Playing XI

Cricket World Cup २०२३ : आज होत असलेल्या बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२३ च्या २३ व्या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला. कर्णधार एडन मार्करमनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 2:15 PM IST

Updated : Oct 24, 2023, 3:12 PM IST

मुंबई Cricket World Cup २०२३ : विश्वचषक 2023 चा 23 वा सामना आज आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ मैदानात चुरशीनं उतरतील त्यामुळे या सामन्याच्या विजयाकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड : बांग्लादेश गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकलेत आणि गुणतालिकेत तिसरे स्थान कायम राखलं आहे. आजचा बांग्लादेशविरुद्धचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या क्रमांकावर येण्याची पूर्ण आशा आहे. या दोन देशांदरम्यान आतापर्यंत २४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत ज्यात दक्षिण आफ्रिकेनं १७ सामने जिंकले आहेत. दोघांमधील विश्वचषक सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, ४ सामने झाले आहेत ज्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी समान म्हणजेच दोन सामने जिंकले आहेत.

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन) : तन्झिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स

हेही वाचा :

  1. Cricket world cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानं बदलला गुणतक्ता, इंग्लंड तळाला तर अफगाणिस्ताननं घेतली झेप

Last Updated : Oct 24, 2023, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.