ETV Bharat / sports

Sachin Tendulkars Life Size Statue : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं 'वानखेडे'वर होणार अनावरण, अनेक दिग्गज राहणार उपस्थित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 1:43 PM IST

Updated : Oct 31, 2023, 6:18 PM IST

Sachin Tendulkar Life Size Statue : भारताचा दिग्गज सलामीवीर भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 1 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमवर या सोहळ्याला अनेक नेत्यांसह माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

Sachin Tendulkars Life Size Statue
Sachin Tendulkars Life Size Statue

मुंबई Sachin Tendulkars Life Size Statue : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) 1 नोव्हेंबरला सचिनचं होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या नावावर अनेक विक्रम असलेल्या सचिनसाठी त्याच्या कारकिर्दीतलं वानखेडे स्टेडियम एक महत्वाचं मैदान आहे. क्रिकेट विश्वचषकातील भारत-श्रीलंका सामन्याच्या पूर्वसंध्येला 200 कसोटी सामने खेळणाऱ्या 50 वर्षीय तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 15,821 कसोटी धावा आणि तब्बल 18,426 एकदिवसीय धावा करणारा 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर या सोहळ्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहे.

अनेक राजकीय नेते, माजी खेळाडू राहणार उपस्थित : या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे असतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तसंच या सोहळ्याला अनेक माजी क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज दिवंगत शेन वॉर्नच्या चेंडूवर सरळ षटकार मारणारा सचिन तेंडुलकरचा 22 फुटांचा पुतळा प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद काळे यांनी बनवला असून बुधवारी तो लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी याबाबतची कल्पना मांडली होती.

अनेक पिढ्यांना मिळेल प्रेरणा : सचिन हा प्रत्येक नवोदित क्रिकेटपटूसाठी प्रेरणास्थान आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला देशभरातील आणि जगभरातील चाहत्यांसाठी काहीतरी करायचंय. हा पुतळा भविष्यातील क्रिकेट खेळणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल आणि मुंबई क्रिकेटचा वारसा ते पुढं नेतील, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव अजिंक्य नाईक म्हणाले.

शिवाजी पार्कमध्ये केला सराव : सचिन तेंडुलकरचं बालपण वांद्रे उपनगरातील साहित्य सहवास इथं गेलं. मध्य मुंबईतील शिवाजी पार्क इथं त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्यानं सुरुवातीचे धडे घेतले. तो सुरुवातीला मुंबईसाठी खेळला आणि आधुनिक काळातील महान फलंदाज बनला. तर सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे ख्यातनाम मराठी लेखक होते.

हेही वाचा :

  1. World Cup 2023 : विराटन कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या 'या' लाजिरवाण्या विक्रमाची केली बरोबरी
  2. Cricket World Cup २०२३ : भारतानं साहेबांची जिरवली, 'विश्वविजेते' स्पर्धेतून बाहेर!
  3. Cricket world cup 2023 IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध नाणेफेकीला येताच रोहित शर्माचं होणार अनोख शतक; काय असू शकते दोन्ही संघांची रणनिती?

Last Updated : Oct 31, 2023, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.