अहमदाबाद Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना १९ नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचा प्रयत्न करणार असून, ऑस्ट्रेलियाचा सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहितनं विकेटचं मूल्यांकन करून प्लेइंग ११ बाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. याशिवाय रोहितनं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचंही कौतुक केलं.
-
🎙️ #TeamIndia Captain Rohit Sharma addressing the pre-match press conference ahead of the #CWC23 Final 🏟️#MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/7SgUX0ws9q
— BCCI (@BCCI) November 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🎙️ #TeamIndia Captain Rohit Sharma addressing the pre-match press conference ahead of the #CWC23 Final 🏟️#MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/7SgUX0ws9q
— BCCI (@BCCI) November 18, 2023🎙️ #TeamIndia Captain Rohit Sharma addressing the pre-match press conference ahead of the #CWC23 Final 🏟️#MenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/7SgUX0ws9q
— BCCI (@BCCI) November 18, 2023
मोहम्मद शमीचं कौतुक केलं : या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं रोहितनं तोंडभरून कौतुक केलं. "मोहम्मद शमी सुरुवातीला खेळू शकला नाही. तो त्याच्यासाठी खूप कठीण क्षण होता. मात्र तो सिराज आणि इतर गोलंदाजांना साथ देत होता. त्याला संघात का घेतलं नाही, याबद्दल आम्ही त्याच्याशी बोललो. तो त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेत होता. यावरून तो स्पर्धेपूर्वी कोणत्या मानसिक अवस्थेत होता हे दिसून येतं", असं शमी म्हणाला.
अंतिम सामन्यात अश्विनला संधी मिळेल का : अंतिम सामन्यात प्लेइंग ११ मध्ये अश्विनला संधी मिळेल का? या प्रश्नावर रोहितनं स्पष्ट उत्तर दिलं नाही. "हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे. मी ५० षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालोय. आम्ही प्लेइंग ११ बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. १५ पैकी कोणीही खेळू शकतो. आम्ही विकेटचं मूल्यांकन करू आणि निर्णय घेऊ. विकेट बघून मग निर्णय घ्यावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थानं आणि कमकुवतता लक्षात घेऊन निर्णय घेईल हे नक्की", असं त्यानं स्पष्ट केलं.
द्रविडची भूमिका मोठी : रोहित शर्मानं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचंही कौतुक केलं. "द्रविडची भूमिका खूप मोठी आहे. द्रविडचा खेळाडूंना पूर्ण पाठिंबा असतो. तो खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य देतो. द्रविड खेळाडूंच्या बाजूने उभा आहे. २०२२ च्या टी २० विश्वचषकानंतर त्यानं खेळाडूंना साथ दिली. त्यानं भारतीय क्रिकेटसाठी जे काही केलं ते खूप मोठं आहे. आता त्यालाही या क्षणाचा एक भाग व्हायचं आहे, असं रोहितनं सांगितलं.
गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली : रोहित म्हणाला, "या स्पर्धेत आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या ४-५ सामन्यांमध्ये आम्ही लक्ष्याचा पाठलाग करत होतो. त्यांना भारतात ३०० च्या खाली रोखणं सोपं नाही. आमचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू उत्कृष्ट आहेत. आम्ही लक्ष्याचा बचाव करत असताना गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराह, शमी, सिराज यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनाही विकेट मिळाल्या आहेत".
भारतीय खेळाडूंवर दबाव असेल का : रोहित म्हणाला, 'बाहेरचं वातावरण, अपेक्षा आणि दबाव काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आपल्या खेळावर टिकून राहणं गरजेचं आहे. ड्रेसिंग रूममध्ये शांत वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही काम केलंय. खेळाडूंनी आतून काय वाटतं, मला माहीत नाही. पण टीम मीटिंग आणि ट्रेनिंग दरम्यान प्रत्येकजण शांत असतो. भारतीय क्रिकेटपटू असल्यानं तुम्हाला दडपणांना सामोरं जावं लागतं, असं तो म्हणाला.
हेही वाचा :