ETV Bharat / sports

Cricket World Cup experience : कॅनव्हासवर रंगणार विश्वचषकाचा थरार, क्रिकेटपटूंच्या अलवार अनुभवांची 'ऑडिबल'नं आणली खास मेजवानी - Cricket World Cup

Cricket World Cup experience : विश्वचषक 2023 आता रंगात येऊ लागला आहे. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांनी त्यांच्या जुन्या शत्रुत्वाला तिलांजली दिल्यानं हा विषय चर्चेत आहे. प्रेक्षकांना यानिमित्तानं एक खास मेजवानी मिळणार आहे. हे क्रिकेटपटू ऑडिओबुकद्वारे त्यांचा प्रवास शेअर करणार आहेत. वाचा यासंदर्भातील मीनाक्षी राव यांचा खास लेख.

Cricket World Cup experience
Cricket World Cup experience
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 7:59 PM IST

अहमदाबाद : क्रिकेट वश्वचषकासंदर्भात मीनाक्षी राव यांनी स्पर्धेचे विविध पैलू समोर आणले आहेत. यामध्ये विराट कोहली तसंच नवीन-उल-हकच्या धमाकेदार खेळापासून स्टेडियमच्या वैशिष्ठ्यांपर्यंत अनेक गोष्टी त्यांनी मांडल्यात. या दोन खेळाडूंच्या ऑडिओबुक विषयी त्या या लेखात सविस्तर प्रकाश टाकणार आहेत.

कोहली-हक यांच्यातील खडाजंगी संपुष्टात - अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक जेव्हा विराट कोहलीसोबत मिड-फील्डवर चॅटसाठी आले तेव्हा कॅमेरे हायपर-क्लिक मोडवर गेले होते. हक आणि कोहलीची खडाजंगी स्पष्टपणे दिसून आली. दोघे बोलत असताना कोहलीनं हकची पाठ थोपटून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सोशल मीडियावर या दोघांच्यातील 'सुख-संवादा'ची मुक्ताफळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उधळली. ती आपण पाहिलीच आहेत.

मात्र आता या दोघांच्यातील शीतयुद्ध संपल्याचं दोघांनीही स्पष्ट केलं आहे. हे दोघेही आता छान गप्पा मारणार असल्याचं पीटीआयशी बोलताना स्पष्ट केलं आहे. कोहलीच्या घरच्या मैदानावर ही गोष्ट होणार असल्यानं ती इंटरेस्टिंग असेल. दुसरीकडे, कोहलीनं स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, ज्या काही गोष्टी घडतात. त्या फक्त मैदनात. मैदानाच्या बाहेर त्याचा काहीही संबंध नसतो. मात्र आमचे फॅन्स सोशल मीडियावर त्यांचा इशू करतात. त्यांचही काही चुकीचं नाही. आम्ही मात्र मैदान सोडताना एकमेकांना हस्तांदोलन करुन सगळं तिथेच सोडून देतो.

माजी सलामीवीर गौतम गंभीरनं सामन्या नंतरच्या मिडफिल्ड चॅटमध्ये स्पष्ट केलं की, “मी प्रेक्षकांना आणि स्टेडियमबाहेरील लोकांना सांगू इच्छितो जे सोशल मीडियावर एखाद्या खेळाडूला ट्रोल करत आहेत, एखाद्या खेळाडूबद्दल विचित्र गोष्टी बोलत आहेत किंवा त्यांची नावे घेत आहेत, ते योग्य नाही. कारण जेव्हा तुम्ही संघाचे प्रतिनिधित्व करत असता तेव्हा तुमची आवड समजून घ्यावी लागते. जे घडले तो आता भूतकाळ आहे, हे समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या खेळाडूंसाठी ही मोठी गोष्ट आहे.”

क्रिकेटचा कलात्मक आविष्कार - पद्मश्री परेश मैती, एक प्रसिद्ध भारतीय चित्रकार आहेत. ते 10 जागतिक दर्जाच्या भारतीय स्टेडियमची चित्रे कॅनव्हासवर साकारणार आहेत. त्यातून दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या शहरांतील या धमाकेदार विश्वचषकाचा इतिहास कॅनव्हासवर जिवंत होताना दिसेल. जसजसे सामने होतील, तसतसे प्रेक्षक आणि कलाप्रेमींना मैतींच्या सर्जनशीलतेचे साक्षीदार होण्याची अनोखी संधी मिळेल. ज्यामुळे विश्वचषकाच्या अनुभवाला पूर्णपणे नवीन आयाम मिळेल.

मैती त्यांच्या कमाल करणाऱ्या शैलीतून क्रिकेट विश्वचषकाचा थरार कलात्मक दृष्टीने ते मांडतील. त्यांच्या या कलाकृतींची पहिली झलक आपल्याला 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीत झालेल्या विश्वचषक सामन्यात ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर विजय मिळवला होता. त्यावेळी पाहायला मिळाली.

चित्रकार मैती म्हणाले की, जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकाचं यजमानपद भारताला मिळालं ही एक पर्वणीच आहे. मी दिल्लीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील खेळ पाहिला आणि त्याचे चित्र रेखाटले. मला वाटले की ही स्पर्धा सर्वांना एकत्र आणणारा एक उत्सव आहे. ICC चा स्टेडिया आर्टिस्ट असण्याचा मला सन्मान मिळाला याचा अभिमान वाटतो. या सामन्यांच्या दरम्यान १० स्टेडियमवरचा उत्साह रेखाटण्यासाठी मी उत्सुक आहे.

क्रिकेट विश्वातील माहितीचा खजिना ऑडिबलवर - क्रिकेट विश्वचषक असो किंवा असा एखादा मोठा इव्हेंट. त्याअनुषंगानं अनेक गोष्टी बाजारात येत असतात. यावेळीही काही गोष्टींचा कमी नाही. त्यातच आता जमाना आहे ऑडिबलचा. अर्थात ऑडिओ बुकचा. ऑडिबलनं आजपर्यंतच्या दिग्गज क्रिकेटपटूंना बोलतं-लिहितं केलंय. ऑडिबलने महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रवी शास्त्री ते ख्रिस गेल आणि वसीम अक्रम या महान क्रिकेटपटूंच्या प्रवासाविषयी मनोरंजक माहिती दिली आहे.

क्रिकेटच्या रोमांचक आठवणी या क्रिकेटपटूंनी स्वतः शब्दबद्ध केल्यात. तसंच जाणकारांनीही त्यात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांनी लिहिलेल्या या मनोरंजक गोष्टी अक्षय घिलडियाल आणि इतरांसारख्या प्रसिद्ध व्हॉईस-ओव्हरमध्ये लोकांना ऐकायला मिळत आहेत. एक अनोखा अनुभव त्यातून क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. स्विंगचा बादशाह वसीम अक्रमची कथा त्यामध्ये आहे. त्याने स्वतःची रंजक कथा लिहिली आहे. त्याला लाहोरच्या गल्लीतून इम्रान खानने कसे उचलले आणि 1992 मध्ये अखेरीस सामनावीर म्हणून कशी कामगिरी केली याचा लेखाजोखा यात ऐकायला मिळतो. हा वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला होता. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स आणि इयान बॉथम ते सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न आणि बॉल-टॅम्परिंग आणि मॅच-फिक्सिंग वाद या सगळ्यावर या ऑडिओ बुकमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

या ऑडिओबुकमध्ये ख्रिस गेलच्या आवृत्तीचं शीर्षक ‘सिक्स मशीन’ असं आहे. यात महान हिटरने स्वत:चं वर्णन केलं आहे. कसोटी सामन्यातील पहिल्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या या एकमेव खेळाडूची कारकिर्द यातून दिसते. गेलने एकदा जे विधान केले होतं त्यावरून तो खऱ्या अर्थाने क्रिकेट जगतो हे दिसून येतं. किंग्स्टनच्या मळकट गल्लीतून झोपडीत राहणारा एक हडकुळा मुलगा क्रिकेट जगताच्या शिखरावर कसा पोहोचतो हे यातून उलगडतं. ‘सिक्स मशीन’ अधिक मोहक होतं ते कॅरिबियन टच असलेले लेरॉय ओसेई-बोन्सू यांच्या अस्सल कथन शैलीतून. ते नुसतं ऐकावच वाटतं.

विराट कोहलीचही चित्तरकथा तो अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघापासून सुरू होते. त्याच्या क्रिकेटचा प्रवास केवळ क्रिकेटचा नसून उत्कटतेची, चिकाटीची, क्रिकेटवर अढळ श्रद्धा आणि तंदुरुस्तीची कथा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

क्रिकेट विश्वातील एकाकाळचा 'राजेश खन्ना' म्हणता येईल असा रवी शास्त्रीही या ऑडिओबुकमध्ये आपल्याला अनुभवता येतो. त्या काळातील शेकडो तरुणींच्या दिलाची रवी शास्त्री धडकन होता. या अष्टपैलू खेळाडू, प्रशिक्षक, समालोचकाची भूमिका साकारलेल्या क्रिकेटपटूसाठी अब्जावधी ह्रदये धडधडत असत. त्याने देखील त्याच्या वैयक्तिक अनुभवातून क्रिकेट विश्वाचा पसारा अलगद मांडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.