नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : आयसीसी विश्वचषकात आजच्या १३ व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा मुकाबला अफगाणिस्तानशी होता. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. तर अफगाणिस्तानच्या संघात एक बदल होता.
अफगाणिस्तानच्या सर्वबाद २८४ धावा : इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजनं ५७ चेंडूत सर्वाधिक ८० धावा केल्या. तर इकराम अलीखिलनं ६६ चेंडूत ५८ धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशीदनं ४२ धावा देत ३ बळी घेतले. तर मार्क वुडनं दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
हॅरी ब्रूकची एकाकी झुंज : अफगाणिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर बेयरस्टो २ धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज नियमित अंतरानं बाद होत गेले. एका टोकावरून हॅरी ब्रूकनं एकाकी झुंज दिली. त्यानं ६१ चेडूत ६६ धावा केल्या. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. अफगाणिस्तानकडून फिरकीपटू राशिद खान आणि मुजीब उर रहमाननं प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. मुजीबला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन :
इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हैरी ब्रूक, जोस बटलर (यष्टिरक्षक/कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, क्रिस वोक्स, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टॉपले.
अफगाणिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.
हे ही वाचा :