ETV Bharat / sports

वर्ल्ड कप जिंकला तर संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणार प्लॉट, भाजपा नेत्याची घोषणा

Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं क्रिकेट विश्वचषक जिंकला तर संघातील प्रत्येक खेळाडूला जमिनीचा भूखंड मिळणार आहे. एका भाजपा नेत्यानं नुकतीच ही घोषणा केली. वाचा पूर्ण बातमी...

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 4:59 PM IST

राजकोट (गुजरात) Cricket World Cup 2023 : रविवारी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियानं या विश्वचषकात शानदार कामगिरी केली असून, चाहते भारताला विश्वविजेता म्हणून पाहण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, गुजरातच्या राजकोट जिल्ह्याचे भाजपा नेते केयूर ढोलरिया यांनी एक मोठी घोषणा केली.

प्रत्येक खेळाडूला जमिनीचा भूखंड मिळणार : जर भारतीय संघानं विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला तर संघातील प्रत्येक खेळाडूला जमिनीचा भूखंड मिळणार आहे. राजकोट तालुक्याच्या सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते केयूर ढोलरिया यांनी म्हटलं आहे की, जर भारतीय संघानं विश्वचषक जिंकला, तर संघातील १५ खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक अशा १६ जणांना भायसर-काथरोट शिवम जेमिन इंडस्ट्रीज झोनमध्ये प्लॉट देण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला अनेक मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या सामन्याला चित्रपट सृष्टीतील अनेक सितारे हजेरी लावतील. हा सामना पाहण्यासाठी आयसीसीनं यापूर्वीच्या सर्व विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आमंत्रण दिलंय. तसेच हा सामना पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षकांसह अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही तफावत राहू नये, यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना : अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना आणि हवन केल्या जात आहे. प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्याच्या साधुसंतांनी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास लेझर लाईट शोच आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूरच्या तरुणांनी हा शो अरेंज केला आहे.

हेही वाचा :

  1. टीम इंडियाच्या विजयासाठी कुठे प्रार्थना तर कुठे हवन, किन्नर समाजानंही केली विशेष पूजा
  2. जगात भारी कोल्हापुरी! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर चमकणार कोल्हापूरचा 'लेझर शो'
  3. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्व 'विश्वविजेते' कर्णधार राहणार उपस्थित; 'शेजारी' मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.