नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल. यानंतर आपल्याला क्रिकेटचा विश्वविजेता मिळेल. आता तो भारत असेल की ऑस्ट्रेलिया, हे येणारा काळच सांगेल. मात्र त्याआधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वर्ल्ड कप २०२३ चा सर्वात प्रतिष्ठित 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार कोणाला मिळू शकतो.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_mk.jpg)
कोणाला मिळतो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार : विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदा या पुरस्काराच्या यादीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची नावं आघाडीवर आहेत. या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिन गोलंदाज अॅडम झम्पाचाही या यादीत समावेश आहे.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_vk.jpg)
सर्वोत्कृष्ट फलंदाजाला पुरस्कार मिळेल का : या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली. त्याच्या नावावर १० सामन्यांच्या १० डावात तब्बल ७११ धावा आहेत. एका विश्वचषकात कोणत्याही खेळाडूनं केलेल्या हा सर्वाधिक धावा आहेत. या दरम्यान कोहलीनं ५ अर्धशतकं आणि ३ शतकंही झळकावली. त्याच्या व्यतिरिक्त, क्विंटन डी कॉक (५९४), रचिन रवींद्र (५७८), डॅरिल मिशेल (५५२) आणि रोहित शर्मा (५५०) हे ५ सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. रोहित शर्मा वगळता सर्व खेळाडूंची विश्वचषक मोहीम संपलीये. अशा स्थितीत विराटला मागे टाकणं कुणालाही शक्य नाही. त्यामुळे तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_s-2.jpg)
गोलंदाज पुरस्कार मिळवेल : टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. शमीनं केवळ ६ सामन्यात ५.०१ च्या इकॉनॉमीसह २३ विकेट घेतल्या. या काळात त्यानं तीन वेळा ५ विकेट्स आणि एकदा ४ विकेट्स घेतल्या आहेत. शमी शिवाय, अॅडम झम्पा (२२), दिलशान मधुशंका (२१), गेराल्ड कोएत्झी (२०) आणि जसप्रीत बुमराह (१८) हे या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप ५ गोलंदाज आहेत. यापैकी मधुशंका आणि कोएत्झी यांची मोहीम संपुष्टात आलीये.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_s.jpg)
झम्पा आणि बुमराह देखील दावेदार : आता झम्पा आणि बुमराह यांच्याकडे अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करून 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कारासाठी दावा करण्याची संधी असेल. अहमदाबाद येथे १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात झम्पानं २ विकेट घेतल्या आणि शमी विकेट रहित राहिला तर झम्पा टूर्नामेंटमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरेल. किंवा जसप्रीत बुमराहनं ६ विकेट घेतल्यास तो शमीच्या पुढे जाईल आणि 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा दावेदार होईल.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_b.jpg)
मोहम्मद शमी फेवरेट : मोहम्मद शमीनं सेमी फायनलमध्ये जशी कामगिरी केली तशी कामगिरी फायनलमध्येही केली, तर मात्र झम्पा आणि बुमराहला टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूचा दावा करण्याची संधी मिळणार नाही. शमीनं उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध कठीण काळात ७ विकेट घेतल्या होत्या. आता शमीनं फायनलमध्ये ५ किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्यास त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कार निश्चितच मिळू शकतो.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_v.jpg)
कोहली आणि शमी यांच्यात मुख्य लढत : विश्वचषक २०२३ च्या 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कारासाठी विराट कोहली आणि मोहम्मद शमी प्रमुख दावेदार आहेत. विराट कोहलीनं सुरुवातीपासून सर्व सामने खेळले असून त्यानं चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीला पहिल्या ४ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आलं.
![WORLD CUP 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-11-2023/20047713_v.jpg)
मोहम्मद शमीची अप्रतिम कामगिरी : मोहम्मद शमीनं मिळालेली संधी दोन्ही हातांनी स्वीकारली आणि अवघ्या ६ सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. भारतीय खेळपट्ट्या अनेकदा फलंदाज आणि फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरतात. अशा स्थितीत इतरांच्या तुलनेत वेगवान गोलंदाज आणि कमी सामने खेळणाऱ्या मोहम्मद शमीनं अशी अप्रतिम कामगिरी केली आहे की, त्याला टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला पाहिजे, अशा भावना सर्वत्र आहेत.
-
The #CWC23 final is a battle of the six-hitters 🚀 pic.twitter.com/f0w5xMepGP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The #CWC23 final is a battle of the six-hitters 🚀 pic.twitter.com/f0w5xMepGP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 17, 2023The #CWC23 final is a battle of the six-hitters 🚀 pic.twitter.com/f0w5xMepGP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 17, 2023
हेही वाचा :