कोलकाता Cricket World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा 44 वा सामना शनिवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झाला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने एक लाजिरवाणा विक्रम नोंदवलाय. हरिस रौफ हा एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरलाय. त्यानं इंग्लंडविरुद्ध 3 षटकांत 31 धावा देत हा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर नोंदवला. या सामन्यात त्यानं आपल्या 10 षटकांत 64 धावा दिल्या.
सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला रौफ : पाकिस्तानच्या हरिस रौफनं या विश्वचषकात 9 सामने खेळले आणि त्यादरम्यान त्याची फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्यानं 9 सामन्यांत 533 धावा दिल्या. यासह तो विश्वचषकाच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनलाय. त्याच्या आधी हा विक्रम इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदच्या नावावर होता. 2019 च्या विश्वचषकात त्यानं 526 धावा दिल्या होत्या. आता या यादीत आदिल रशीद दुसऱ्या क्रमांकावर आलाय. त्याचबरोबर श्रीलंकेचा दिलशान मदुशंका या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांनही याच विश्वचषकात 525 धावा दिल्या आहेत. यासह हरिस रौफ एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खाणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यानं 9 सामन्यात 16 षटकार खाल्ले आहेत.
-
In a World Cup edition in history:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Most runs conceded - Haris Rauf.
Most Sixes conceded - Haris Rauf.
- History written in this World Cup...!!! pic.twitter.com/Tg20oZnVlO
">In a World Cup edition in history:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 11, 2023
Most runs conceded - Haris Rauf.
Most Sixes conceded - Haris Rauf.
- History written in this World Cup...!!! pic.twitter.com/Tg20oZnVlOIn a World Cup edition in history:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 11, 2023
Most runs conceded - Haris Rauf.
Most Sixes conceded - Haris Rauf.
- History written in this World Cup...!!! pic.twitter.com/Tg20oZnVlO
विश्वचषकात एका हंगामात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज :
- 533 धावा – हरिस रौफ, पाकिस्तान (2023 विश्वचषक)
- 526 धावा – आदिल रशीद, इंग्लंड (2019 विश्वचषक)
- 525 धावा – दिलशान मधुशंका, श्रीलंका (2023 विश्वचषक)
- 502 धावा – मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया (2019 विश्वचषक)
- 484 धावा – मुस्तफिझूर रहमान, बांग्लादेश (2019 विश्वचषक)
- 481 धावा – शाहीन आफ्रिदी, पाकिस्तान (2023 विश्वचषक)
पाकिस्तानचे विश्वचषकातून पॅकअप : पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी शनिवारी इंग्लंडला मोठ्या फरकानं पराभूत करण्याची गरज होती. मात्र ते तसं करण्यात अपयशी ठरले. त्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानविरुद्ध 50 षटकांत 9 गडी गमावून 337 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अवघ्या 6.4 षटकांत हे लक्ष्य गाठण्याचं आव्हान होतं. पण त्यांनी 6.4 षटकांत 2 गडी गमावून केवळ 30 धावा केल्या. असं करताच पाकिस्तानचं या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं. यामुळं आता विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान अखेर संपुष्टात, इंग्लंडचा शानदार विजय
- Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय, मिशेल मार्शच्या धुवांधार १७७ धावा
- Cricket World Cup 2023 : किवींच्या विजयानं पाकिस्तानचं विश्वचषकात 'पॅकअप', उपांत्य फेरीसाठी करावा लागेल चमत्कार; इंग्लंडनं प्रथम फलंदाजी केल्यास 'खेळ खल्लास'