ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 NZ vs AFG : अफगाणिस्तानच्या 'फिरकी त्रिकूटाचं' न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान - Afghanistan to challenge New Zealand

Cricket World Cup 2023 NZ vs AFG : दिल्लीत झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानचं लक्ष्य आता न्यूझीलंड असणार आहे. न्यूझीलंडनं आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले असून धावगतीच्या आधारावर न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यांत न्यूझीलंडसमोर अफगाणिस्तानच्या फिरकी त्रिकूटाचं आव्हान असेल.

Cricket World Cup 2023 NZ vs AFG
Cricket World Cup 2023 NZ vs AFG
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 9:24 AM IST

Updated : Oct 18, 2023, 10:04 AM IST

चेन्नई Cricket World Cup 2023 NZ vs AFG : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून अफगाणिस्ताननं विश्वचषकातील सर्व संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळं आज होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला कमी समजण्याची चूक न्यूझीलंड करणार नाही. पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात हशमतुल्ला शाहिदीच्या संघानं इंग्लंडसारख्या बलाढ्या संघाला पराभूत करून नवा इतिहास रचला.

टॉम लॅथम पुन्हा करणार नेतृत्व : न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळं तो काही सामन्यांतून बाहेर पडला. त्यामुळं न्यूझीलंडचं नेतृत्व पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम करणार आहे. आयपीएलदरम्यान झालेल्या एसीएलच्या दुखापतीमुळं पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडलेला विल्यमसन बांगलादेशविरुद्ध ७८ धावा केल्यानंतर अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळं बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीतही चमकदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला सलग चौथा विजय नोंदवण्यासाठी चांगला खेळ कारावा लागणार आहे.

न्युझीलंडसमोर फिरकीचं आव्हान : न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला आहे. तो या सामन्यात खेळू शकतो की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे. न्यूझीलंडकडे विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेलसारखे फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. तर अष्टपैलू रचिन रवींद्रनंही आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलंय. आता त्यांना रशीद खान, मुजीब-ऊर-रहमान आणि मोहम्मद नबी यांच्या फिरकीचा सामना करावा लागेल. चेपॉकच्या टर्निंग विकेटवर हे फिरकीचं त्रिकूट न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतं.

न्यूझीलंडचं पारडं जड : अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजनं दोन सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत, तर कर्णधार शाहिदी, अजमतुल्ला ओमरझाई आणि इक्रम अली खिल यांनीही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. मात्र आता त्यांना ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांच्या वेगवान आणि रवींद्र व मिचेल सँटनरच्या फिरकीचा सामना करावा लागेल. विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले असून दोन्ही वेळा न्यूझीलंडनं विजय मिळवलाय.

संघ यातून निवडणार :

  • अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
  • न्यूझीलंड : टॉम लाथम (कर्णधार/ यष्टीरक्षक) , डेवोन कोंवे, विल यंग, मार्क चैपमैन, डेरिल मिशेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, ईश सोढी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मैट हेनरी.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आणखी एक उलटफेर, नेदरलॅंडचा दक्षिण आफ्रिकेवर धमाकेदार विजय
  2. Cricket World Cup 2023 : पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर; आजचा सामना 'करो या मरो'
  3. Cricket World Cup २०२३ : गतविजेत्या इंग्लंडवर मोठी नामुष्की, कमकुवत अफगाणिस्ताननं धूळ चारली

Last Updated : Oct 18, 2023, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.