हैदराबाद : न्यूझीलंडच्या संघानं या विश्वचषकात आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. किवीजनं आपले पहिले तिन्ही सामने जिंकले असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. मात्र आता या संघाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
-
Not the news New Zealand were hoping for so early in their #CWC23 campaign.https://t.co/bYApA5izYX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Not the news New Zealand were hoping for so early in their #CWC23 campaign.https://t.co/bYApA5izYX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 14, 2023Not the news New Zealand were hoping for so early in their #CWC23 campaign.https://t.co/bYApA5izYX
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 14, 2023
पुन्हा दुखापत झाली : संघाचा कर्णधार केन विल्यमसननं गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध पुनरागमन केलं होतं. तो संघात परतला आणि त्यानं शानदार अर्धशतकही झळकावलं. मात्र या सामन्यात त्याला पुन्हा दुखापत झाली. ताज्या माहितीनुसार, विल्यमसन सध्या विश्वचषकाचे पुढील काही सामने खेळू शकणार नाही. पण तो संघासोबतच राहणार आहे. पुढच्या महिन्यात बरा झाल्यानंतर तो संघात पुनरागमन करू शकतो.
बांगलादेशविरुद्ध पुनरागमन केलं होतं : केन विल्यमसनला आयपीएल २०२३ च्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाली होती. यानंतर विल्यमसनवर शस्त्रक्रिया झाली. प्रदीर्घ काळ संघातून बाहेर राहिल्यानंतर त्यानं बांगलादेशविरुद्ध पुनरागमन केलं. दुखापतीमुळे तो विश्वचषकातील पहिले दोन सामनेही खेळू शकला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि नेदरलँडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो खेळला नाही. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत त्यानं शानदार अर्धशतक ठोकलं. या सामन्यात विल्यमसननं १०७ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं ७८ धावा केल्या. मात्र एक धाव घेताना त्याच्या अंगठ्याला थ्रो लागला. त्यामुळे दुखापत होऊन तो निवृत्त झाला आणि सामन्यातून बाहेर पडला.
टॉम ब्लंडेलचा संघात समावेश : यानंतर त्याच्या अंगठ्याचं स्कॅन करण्यात आलं. स्कॅनमध्ये विल्यमसनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं. यामुळे तो आता जवळपास महिनाभर संघाबाहेर राहणार आहे. विल्यमसनच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी टॉम ब्लंडेलचा संघात समावेश करण्यात आलाय. केन विल्यमसन संघासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार असते. त्याच्या नेतृत्वातचं संघानं गेल्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : रोहितनं वेळोवेळी केली शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा, आता अडथळा पाकिस्तानचा!
- Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर दिसणार क्रिकेटचा थरार, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश
- Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले