अहमदाबाद (गुजरात) Cricket World Cup २०२३ : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला १९१ धावांवर ऑलआऊट केलं. या सामन्यादरम्यान मैदानावर एक विचित्र घटना घडली. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला बाद करण्यापूर्वी केलेल्या कृतीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पाकिस्ताननं अब्दुल्ला शफीकची विकेट लवकर गमावली. त्यानंतर इमाम उल हकनं कर्णधार बाबर आझमसोबत संघाचा डाव सावरला.
-
Mantra from Hardik Pandya to the ball.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Next ball, Imam Ul Haq was dismissed. pic.twitter.com/n49dGtDOx9
">Mantra from Hardik Pandya to the ball.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
Next ball, Imam Ul Haq was dismissed. pic.twitter.com/n49dGtDOx9Mantra from Hardik Pandya to the ball.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
Next ball, Imam Ul Haq was dismissed. pic.twitter.com/n49dGtDOx9
हार्दिक पांड्याची मॅजिक ट्रिक : इमाम उल हक हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानं ३८ चेंडूत ३६ केल्या. हा चेंडू त्याच्या बॅटपासून दूर जात होता. मात्र त्यानं बॅकफूटवरून ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो स्टंपच्या मागे घेलबाद झाला. हा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिक पांड्यानं चेंडूकडे पाहून काही शब्द उच्चारले. हार्दिकला त्याच चेंडूवर विकेट मिळाल्यानं चेंडू त्याचे आदेश ऐकत असल्याचा भास झाला. या विचित्र घटनेनं जगभरातील चाहत्यांच लक्ष वेधून घेतलंय.
-
Bye, bye - Imam Ul Haq...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thank you for coming, says Hardik Pandya. pic.twitter.com/KBenNA82po
">Bye, bye - Imam Ul Haq...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
Thank you for coming, says Hardik Pandya. pic.twitter.com/KBenNA82poBye, bye - Imam Ul Haq...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
Thank you for coming, says Hardik Pandya. pic.twitter.com/KBenNA82po
विराट कोहलीनं चुकीची जर्सी घातली : फक्त हार्दिक पांड्याची ही मॅजिक ट्रिकच या मॅचमध्ये चर्चेचा मुद्दा नव्हती. तर स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीनं डावाच्या सुरुवातीला केलेल्या एका कृतीनं सर्वाचंच लक्ष वेधलं. विराट कोहली सामन्याच्या सुरुवातील तिरंग्याऐवजी चुकून पांढर्या पट्ट्यांची जर्सी घालून मैदानावर आला. हे त्याच्या नंतर लक्षात आलं. त्यानंतर त्यानं आपली चूक सुधारली. विराट कोहलीची ही कृती भारत-पाकिस्तान सामन्याच्या पहिल्या डावात चर्चेचा मुद्दा बनली होती.
-
Magic whisperer ✨ #AmiIndia #INDvPAK #CWC23 pic.twitter.com/a3eANoczFc
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Magic whisperer ✨ #AmiIndia #INDvPAK #CWC23 pic.twitter.com/a3eANoczFc
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 14, 2023Magic whisperer ✨ #AmiIndia #INDvPAK #CWC23 pic.twitter.com/a3eANoczFc
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 14, 2023
हेही वाचा :