अहमदाबाद Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. यासह तो आता विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. बुमराहनं पाकिस्तानविरुद्ध ७ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले. याआधी त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध ४ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ बळी घेतले होते.
गोलंदाजीत बुमराह पहिल्या स्थानी : बुमराहच्या नावे या विश्वचषकाच्या ३ सामन्यात ८ विकेट्स आहेत. बुमराहशिवाय न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री हे देखील प्रत्येकी ८ विकेट्स घेऊन दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. मात्र उत्कृष्ट सरासरी आणि इकॉनॉमीमुळे बुमराह पहिलं स्थान पटकावलं. या विश्वचषकात जसप्रीत बुमराहनं केवळ ३.४४ ची इकॉनॉमी आणि ११.६२ च्या सरासरीनं धावा दिल्या आहेत.
-
Jasprit Bumrah in this World Cup 2023:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
10-0-35-2 vs Australia.
10-0-39-4 vs Afghanistan.
7-1-19-2 vs Pakistan.
He is now joint leading wickettaker in this World Cup - The GOAT. pic.twitter.com/ZpMErNKcU6
">Jasprit Bumrah in this World Cup 2023:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 14, 2023
10-0-35-2 vs Australia.
10-0-39-4 vs Afghanistan.
7-1-19-2 vs Pakistan.
He is now joint leading wickettaker in this World Cup - The GOAT. pic.twitter.com/ZpMErNKcU6Jasprit Bumrah in this World Cup 2023:
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 14, 2023
10-0-35-2 vs Australia.
10-0-39-4 vs Afghanistan.
7-1-19-2 vs Pakistan.
He is now joint leading wickettaker in this World Cup - The GOAT. pic.twitter.com/ZpMErNKcU6
रोहित शर्मानं मोडला आणखी एक रेकॉर्ड : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी करत दमदार अर्धशतक झळकावलं. रोहित शर्मानं ३६ चेंडूंचा सामना १३३.३३ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटनं ५० धावा पूर्ण केल्या. रोहित ६३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं ८६ धावा करून बाद झाला. या सामन्यात रोहित शर्मानं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आता रोहित वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. यासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे. रोहित शर्माच्या नावे वनडेमध्ये ३०० षटकारांची नोंद झाली आहे. भारताच्या डावातील ९ व्या षटकात त्यानं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला दोन षटकार मारून वनडेत ३०० षटकार पूर्ण केले.
-
🚨 Milestone Alert 🚨
— BCCI (@BCCI) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
3⃣0⃣0⃣ ODI Sixes & Going Strong 💪 💪
Rohit Sharma 🤝 Another Landmark
Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/fjrq0AQFyF
">🚨 Milestone Alert 🚨
— BCCI (@BCCI) October 14, 2023
3⃣0⃣0⃣ ODI Sixes & Going Strong 💪 💪
Rohit Sharma 🤝 Another Landmark
Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/fjrq0AQFyF🚨 Milestone Alert 🚨
— BCCI (@BCCI) October 14, 2023
3⃣0⃣0⃣ ODI Sixes & Going Strong 💪 💪
Rohit Sharma 🤝 Another Landmark
Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/fjrq0AQFyF
रोहितचा षटकारांचा विक्रम : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्यानं वनडेत ३५१ षटकार ठोकले आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल दुसऱ्या स्थानी असून, त्याच्या नावे ३३१ षटकार आहेत. रोहित जर अशीच दमदार कामगिरी करत राहिला तर तो आगामी काळात या दोघांचेही विक्रम मोडू शकतो.
-
Most ODI sixes:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Shahid Afridi - 351.
Chris Gayle - 331.
Rohit Sharma - 300*. pic.twitter.com/7JG9m4SFZW
">Most ODI sixes:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
Shahid Afridi - 351.
Chris Gayle - 331.
Rohit Sharma - 300*. pic.twitter.com/7JG9m4SFZWMost ODI sixes:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
Shahid Afridi - 351.
Chris Gayle - 331.
Rohit Sharma - 300*. pic.twitter.com/7JG9m4SFZW
एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार : यासह रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माच्या नावे विश्वचषकात ६९ षटकार आहेत. या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं ११३ षटकार मारले आहेत. रोहितनंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा नंबर लागतो. तो ६७ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा :