ETV Bharat / sports

Cricket world cup 2023 IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध नाणेफेकीला येताच रोहित शर्माचं होणार अनोख शतक; काय असू शकते दोन्ही संघांची रणनिती? - विराट कोहली

Cricket world cup 2023 IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अटीतटीचा सामना होईल. भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे, तर इंग्लंडचा संघ स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहे. तसंच या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीला येताच त्याच्या नावावर अनोखा विक्रम होणार आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 11:14 AM IST

लखनऊ Cricket world cup 2023 IND vs ENG : यंदाच्या विश्वचषकातील 29 व्या सामन्यात आज गतविजेत्या इंग्लंड आणि भारतीय संघात लखनऊ इथं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीला येताच त्याचं अनोखं शतक पूर्ण होणार आहे.

रोहित 100व्यांदा करणार नेतृत्व : लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर जेव्हा रोहित शर्मा नाणेफेकीसाठी येईल, तेव्हा तो आजच्या सामन्यात 100 व्यांदा भारतीय संघाच नेतृत्व करेल. ही गोष्ट रोहितसाठी नक्कीच अभिमानास्प असेल. 2017 मध्ये रोहित शर्मानं पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र तेव्हा तो नियमित कर्णधार नव्हता. नंतर विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नियमित कर्णधार बनला. कर्णधार म्हणून त्यानं आतापर्यंत भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज रोहित शर्मा मैदानात उतरताच 100 सामन्यात कर्णधार होण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. रोहितनं आतापर्यंत 39 एकदिवसीय, 51 टी-20 तर 9 कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व केलंय. रोहितनं केलेल्या एकूण 99 सामन्यांपैकी 73 सामन्यांत भारतीय संघानं विजय मिळवलाय.

दोन्ही संघांची स्थिती काय : या विश्वचषकात भारतीय संघ हा एकमेव अजिंक्य संघ आहे. ज्यानं या विश्वचषकात आपले सर्व सामने जिंकले आहेत. विश्वचषकात खराब कामगिरीचा सामना करणाऱ्या इंग्लंड संघाला आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकता आलाय. भारतीय संघ रविवारी मैदानात उतरेल तेव्हा त्यांचा विजयी रथ कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, भारतीय संघाला इंग्लंडपासून सावध राहावं लागणार आहे. कारण उपांत्य फेरीत जाण्याचं दडपण इंग्लंड संघावरुन दूर झालंय आणि या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते जवळपास बाहेर पडले आहे. त्यामुळे इंग्लंड पूर्णपणे वेगळ्या शैलीत खेळू शकतो. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी आधीच सांगितलंय की, इंग्लंडला आता भारताची पार्टी खराब करायची आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड काय : इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 106 सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतानं 57 आणि इंग्लंडनं 44 जिंकले आहेत. यात 3 सामन्यांचा निकाल लागला नाही तर 2 सामने बरोबरीत सुटले आहेत. एकदिवसीय विश्वचषकात 1975 पासून 2019 पर्यंत भारताविरोधात इंग्लंडचं पारडं जड दिसतय. दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात इंग्लंड संघानं चार सामन्यात विजय मिळवलाय तर भारताला तीन सामन्यात बाजी मारता आलीय. एक सामना बरोबरीत राहिलाय.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय :

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, रविचंद्रन अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव
  • इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टिरक्षक), हॅरी ब्रूक, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड

हेही वाचा :

  1. Ajay Ratra Interview : पंड्याला दुखापत झाल्यानं रोहित-विराटनं एकत्र विश्वचषकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका निभवावी : अजय रात्रा
  2. Cricket World Cup 2023 AUS vs NZ : 32 षटकार, 65 चौकार, 771 धावा; ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यात मोडण्यात आले 'हे' विक्रम
  3. Cricket World Cup २०२३ : बांग्ला टायगर्सचा लाजिरवाणा पराभव, नेदरलँडनं एकतर्फी सामना जिंकला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.