अहमदाबाद Cricket World Cup 2023 ENG vs AUS : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा 36 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्ताननंतर हे दोन संघ क्रिकेटमधील दुसरे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असल्याचं म्हटलं जातं. 'द अॅशेस' हा लोकप्रिय मालिका प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाते. मात्र, हा विश्वचषक दोन्ही संघांसाठी खूपच वेगळा ठरलाय.
-
Two thrilling matches with major #CWC23 semi-final implications 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Who are you cheering for?#CWC23 | #NZvPAK | #ENGvAUS pic.twitter.com/JZnUmdhHbP
">Two thrilling matches with major #CWC23 semi-final implications 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 4, 2023
Who are you cheering for?#CWC23 | #NZvPAK | #ENGvAUS pic.twitter.com/JZnUmdhHbPTwo thrilling matches with major #CWC23 semi-final implications 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 4, 2023
Who are you cheering for?#CWC23 | #NZvPAK | #ENGvAUS pic.twitter.com/JZnUmdhHbP
गतविजेते इंग्लंड स्पर्धेतून बाहेर : ऑस्ट्रेलिया या विश्वचषकात 6 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे, 6 पैकी 5 सामने गमावून गतविजेते इंग्लंड गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. इंग्लंड यंदाच्या विश्वचषकातून बाहेर आहे. मात्र, तो आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र होण्यासाठी खेळत आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलियासाठी हा महत्त्वाचा सामना आहे.
हेड टू हेड सामने : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 155 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या 155 सामन्यांमध्ये पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध 87 सामने जिंकले आहेत. तोच इंग्लंड संघानं 63 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने टाय झाले आहेत आणि 3 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
पहिल्या डावात फलंदाजी करण सोपं : आतापर्यंत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर एकूण 30 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 16 सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 14 सामने जिंकले आहेत. पहिल्या डावाची सरासरी 235 आणि दुसऱ्या डावाची 205 आहे. अशा परिस्थितीत कर्णधार या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
संघ यातून निवडणार :
- इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गॅस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स
- ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 NZ vs PAK : उपांत्यफेरी गाठण्यासाठी भिडणार न्यूझीलंड-पाकिस्तान; काय असू शकते दोन्ही संघांची रणनिती?
- Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषणाचा फटका विश्वचषकाला, बांग्लादेशनं सराव सत्र रद्द केलं
- Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा नेदरलॅंडवर शानदार विजय, उपांत्य फेरीच्या आशा जिवंत